देशातील ४० नामवंत माती कलाकारांचा समावेश असलेला 'पॉटरफेस्ट' हा मेळावा १० ते १२ जानेवारी या काळात पणजीतील एफ. एल. गोम्स गार्डनमध्ये आयोजित होत आहे. 'पॉटरफेस्ट'ची ही चौथी आवृत्ती आहे. कुंभार कलेतील नवीन आव्हाने आणि नवीन कल्पना या मेळाव्यात आपल्याला अनुभवायला मिळतील. विद्यार्थी, जाणकार आणि कलाप्रेमी या साऱ्यांना कुंभार-कलेतील प्रतिभावान कलाकारांच्या उत्कृष्ट निर्मितीचे साक्षीदार होण्याची ही संधी आहे.
कुंभार-कला ही प्राचीन काळापासून विकसित होत आली आहे आणि आधुनिक काळात तर ती अधिकच प्रगत बनली आहे. नवीन तंत्रे, वेगवेगळ्या प्रकारची नवीन माती, आधुनिक भट्टी तसेच या कलेतील नवीन दृष्टिकोन यातून ही कला खूप बदलली आहे व त्यातून नवनव्या शैलीचाही उगम झाला आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृती आज अधिक सफाईदार आणि चमकदार बनत चालल्या आहेत.
‘पॉटरफेस्ट’ महोत्सव नव्याने विकसित होत असलेल्या माती-कलेबद्दल जागरूकता तयार करण्यासाठी आणि या कलेला सामान्य माणसांच्या जवळ नेण्यासाठी प्रयत्न करत असते. आजचे रिझॉर्टस् आणि हॉटेल्स आपली जागा सुशोभित करण्यासाठी या माध्यमाकडे वळत आहेत. या उद्योगातून निर्माण होणाऱ्या कलाकृतीनां त्यामुळे अधिकाधिक मागणी निर्माण होत चालली आहे. आयटी व्यवसायिक आणि कॉर्पोरेट जीवनाशी संबंध असलेल्या अनेक व्यक्ती व्यस्त जीवनशैली नाकारून आज मातीकामाकडे वळत आहेत. तणावमुक्त आणि आरामशीर जीवन स्वीकारून आजची तरुण पिढीदेखील या माध्यमातून हस्तकला निर्माण करत आहेत.
गोव्यात देखील आज अनेक कला-विद्यार्थी पॉटर स्टुडिओ मधून काम करताना दिसत आहेत. यातील उत्पादनाच्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर पृथ्वी, अग्नी, पाणी आणि हवा यांच्याशी जोडला जाणारा व्यवसाय म्हणून विद्यार्थी या कलेकडे पाहतात. पॉटरफेस्ट महोत्सवात कुंभार कला आणि त्याची प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी असेल. जीवनात चांगल्या गोष्टीची आवड असणाऱ्यांसाठी हे फेस्ट नक्कीच आनंददायी असेल.
भिसाजी गडेकर यांची प्रात्यक्षिके:
१० जानेवारी:
३.३० वाजल्यापासून
११ आणि १२ जानेवारी: सकाळी ११ ते दुपारी १, व सायंकाळी ३.३० नंतर
विक्रम यांची प्रात्यक्षिके
१० ते १२ जानेवारी: सकाळी ११ ते दुपारी १.३० व सायंकाळी २.३० ते रात्री ८ पर्यंत
शंकर तुरी त्यांचे 'आझुलेझोस कलेवर व्याख्यान:
११ जानेवारी: सकाळी १० ते ११
डॅनियल डिसौझा यांचे ‘कुंड्यांची रचना’ यावर व्याख्यान:
११ जानेवारी: सायंकाळी ५.३० ते ६.३०
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.