Imran Khan  Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: माझ्या हत्येसाठी झरदारींनी दहशतवाद्यांना पैसे दिले... इम्रान खान यांचा आरोप

खऱ्या स्वातंत्र्यासाठी जिहाद पुकारण्याचे इम्रान यांचे जनतेले आवाहन

Akshay Nirmale

Imran Khan: पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आता माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर इम्रान यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, इम्रान खान म्हणाले की, गेल्या वर्षी मी म्हटले होते की, चार लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत, ज्यांची नावे रेकॉर्डिंगमध्ये आहेत, ते रेकॉर्डिंग योग्य वेळी प्रसिद्ध केले जाईल. पहिला प्लॅन उघड झाल्यानंतर त्यांच्या हत्येचा प्लॅन ए कधीच अंमलात आला नाही तर हत्येचा दुसरा प्रयत्न वजिराबादमध्ये झाला, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान यांनी म्हटले आहे की, आसिफ झरदारी यांनी त्यांच्यावर आणखी एक हल्ला करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांच्या सहायकांचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटनेला पैसे दिले होते. झरदारींकडून कथितपणे मदत मिळवणाऱ्या त्या चार लोकांच्या नापाक कारस्थानांबद्दल मी आता देशाला सांगत आहे. माझ्यावर हल्ला झाला तर लोकांना हल्लेखोरांबद्दल माहिती असावी."

इम्रान खान म्हणाले की, मी देशातील शक्तिशाली संस्थांना आवाहन करतो की त्यांनी चूक केली आहे. ती चूक लवकरात लवकर मुक्त, निष्पक्ष आणि विश्वासार्ह निवडणुका घेऊन आणि लोकांना त्यांचे नेते निवडण्याची परवानगी देऊन सुधारता येईल. असे नेते जे त्यांना आर्थिक संकटातून वाचवतील.

न्यायपालिकेने या निर्णायक क्षणाला प्रतिसाद द्यावा आणि लोकशाही आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण होईल असे पाहावे. आमच्या पक्षाविरोधातील काळजीवाहू सरकारे नियुक्त केली होती. त्या सरकारांनी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामध्ये 90 दिवसांत निवडणूक घेणे टाळले, जे घटनाविरोधी होते.

ते म्हणाले की, 'जर 90 दिवसांच्या आत निवडणुका झाल्या नाहीत तर उल्लंघन करणाऱ्यांना कलम 6 (उच्च देशद्रोह) ला सामोरे जावे लागेल.' इम्रान यांनी यावेळी पाकिस्तानच्या नागरिकांना 'खरे स्वातंत्र्य' (हकीकी आझादी) मिळविण्यासाठी जिहादसाठी तयार होण्याचे आवाहन केले.

आपण शेवटच्या श्वासापर्यंत किंवा क्रिकेटच्या परिभाषेत शेवटच्या चेंडूपर्यंत या देशासाठी लढणार असल्याची ग्वाही त्यांनी देशाला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kavyashree Kurse: '..बादल पे पाँव है'! काले येथील काव्यश्री कुर्सेने घेतली आकाशझेप; 21व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

1 नाही, 2 नाही 40 कोटींची खोटी बिले! 8 कोटीचा GST घोटाळा; गोव्याच्या व्यापाऱ्याला कोल्हापूर गुप्तचर यंत्रणेच्या पथकाकडून अटक

Inter Kashi I League Trophy: आय-लीग ‘ट्रॉफी’चा घोळ संपेना! इंटर काशीला नवीन करंडक प्रदान; चर्चिल ब्रदर्सचा संताप

Kane Williamson Retirement: केन विल्यमसनचा T20 क्रिकेटला अलविदा, कसोटी क्रिकेटवर करणार लक्ष केंद्रीत; म्हणाला, "युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ"

Goa Road Tender: रस्ता एक, दोन वेगवेगळ्या निविदा! 37 चे अचानक झाले 146 कोटी; गोव्यातील 'या' रस्त्याच्या कामावरून उलटसुलट चर्चा..

SCROLL FOR NEXT