Goa Crime News: जीवनगौरव पुरस्कारप्राप्त अभिनेत्रीला गोव्यात घरात घुसून मारहाण

दहा वर्षांपासून अभिनेत्रीचे गोव्यात वास्तव्य, राहत्या घराच्या मालकीवरून प्रकरण कोर्टात
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: गोव्यात जवळपास दहा वर्षांपासून राहत असलेल्या एका 75 वर्षीय फ्रेंच अभिनेत्रीला गुंडांकडून तिच्याच घरात कोंडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घर सोडण्यासाठी या अभिनेत्रीला धमकावले गेले असून मारहाणही करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी कळंगुट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मरियन बोर्गो (Marianne Borgo) असे या अभिनेत्रीचे नाव असून त्यांचे वय 75 आहे. त्या जवळपास 10 वर्षांपासून गोव्यात राहत आहेत. सध्या ज्या घरात त्या राहत आहेत तिथेच त्यांना कोंडून घातल्याचे आणि त्यांना त्रास दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Goa Crime News
Mahadayi Water Dispute : 'म्हादई'साठीच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी फिरवली पाठ

बोर्गो यांनी युरोपमधील चित्रपट, टीव्ही आणि रंगभूमीवर काम केले आहे. त्यांना गतवर्षीच 38 व्या अलेक्झांड्रिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय भारतातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले आहे. अनेक महोत्सवांत त्यांचा गौरव झाला असून त्यांना गांधी प्राईजनेही गौरविण्यात आले आहे.

जवळपास दशकभरापासून बोर्गो गोव्यात वास्तव्यास आहेत. मात्र त्यांना आता अचानक गुंडांकडून त्रास दिला जात आहे. माझ्याच घरात कैद करून ठेवल्याचा आरोप मरियन यांनी केला आहे. हे प्रकरण मरियन राहत असलेल्या घराच्या मालकीशी निगडीत आहे. फ्रान्सिस्को सौसा या वकीलाकडून 2008 मध्ये मरियन बोर्गो यांनी सध्याचे राहते घर विकत घेतले होते.

2021 मध्ये कोरोनामुळे सौसा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सौसा यांच्या पत्नीने घराच्या मालकीवरून मरियन बोर्गो यांना त्रास द्यायला सुरवात केली. त्यामुळे घरावरील कायदेशीर दाव्याबाबत मरियन यांनी ट्रायल कोर्टात केस दाखल केली आहे. सौसा यांच्या पत्नीने वारंवार या घराचा ताबाचा घ्यायचा प्रयत्न केल्याचे बोर्गो यांनी म्हटले आहे. हे प्रकरण आता न्यायालयाच्या अखत्यारीत आहे.

Goa Crime News
Fire In Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना; घरासह काजूची बाग खाक

दरम्यान, 23 जानेवारीपासून कळंगुट येथील बोर्गो यांच्या घरात त्यांना कैदेत राहावे लागले. 23 जानेवारी रोजी सौसा या त्यांची बहिण आणि इतर सहा खासगी अंगरक्षकांसमवेत बोर्गो यांच्या घरी आल्या.

त्यांनी जीप आडवी लाऊन घराचे गेट ब्लॉक केले. आणि या आवारात मोलकरणीशिवाय कुणालाही यायला बंदी केली. घरातील एका खोलीत लॉक करून ठेवले. मोलकरणीशिवाय कुणालाही भेटू दिले नाही. पाणी आणि वीज कनेक्शनही तोडले. त्यामुळे बोर्गो यांना अंधारात राहावे लागले.

बेडरूममध्ये गेल्यावरून बोर्गो यांना मारहाणही झाली. मरियन यांनी याबाबत कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान घराच्या मालकीचे हे प्रकरण सध्या न्यायालयात असून बोर्गो आणि त्यांचे वकील न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com