Audrey & Kevin Dainik Gomantak
ग्लोबल

अजब प्रेम की गजब कहानी! 19 वर्षीय तरुणीने 61 वर्षीय व्यक्तीशी बांधली लग्नगाठ

मुलीचे नाव आंद्रे (Audrey Cheyenne-Smiley Moon) असून ती एक पोलीस अधिकारी आहे. ती केविन (Kevin) नावाच्या 61 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली.

दैनिक गोमन्तक

प्रेमामध्ये पडणाऱ्या व्यक्ती ना वय पाहतात, ना रंग, ना रुप, त्यांना दिसतं फक्त नि फक्त प्रेम. आणि असंच काहीसं अजब प्रेम अमेरिकेतील (America) या प्रेमीयुगुलांनी केले आहे. या प्रेमात पडलेल्या प्रेमीयुगुलांनी वयाचं अंतर न ठेवता प्रेम केले आहे. 19 वर्षीय तरुणी 61 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. मुलीचे नाव आंद्रे (Audrey Cheyenne-Smiley Moon) असून ती एक पोलीस अधिकारी आहे. ती केविन (Kevin) नावाच्या 61 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली. जरी त्यांची जोडी आजोबा आणि नातीसारखी दिसत असली तरी दोघांमध्ये खूप प्रेम आहे.

द मिरर मधील एका अहवालानुसार, केविन आणि आंद्रे 2020 मध्ये एका ऑनलाइन डेटिंग साइटवर भेटले. आंद्रेने सांगितले की, मी केविनच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित आहे. त्याने साइटवर स्वतःबद्दल जे लिहिले ते पाहून मी खूप प्रभावित झाले. आंद्रेच्या मते, केविनने पोलिस अधिकारी म्हणून काम करत आहे. आंद्रे आणि केविनमध्ये तब्बल 42 वर्षांचे अंतर आहे. सुरुवातीला दोघेही ऑनलाईन बोलत होते. त्यानंतर दोघेही जुलै 2020 मध्ये भेटले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम वाढले. आता दोघांचेही नुकतेच लग्न झाले आहे.

केविनला दोन मुलेही आहेत

केविन विवाहित आहे. केविनला त्याच्या पहिल्या पत्नीपासून 23 आणि 16 वर्षांची दोन मुले देखील आहेत.

पालकांनी पोलिसांना फोन केला

आंद्रेचे पालक त्यांचे नाते स्वीकारत नव्हते. आंद्रेच्या आईचे वय 38 वर्षे आणि वडिलांचे वय 43 वर्षे आहे. आपल्या मुलीचे प्रेमसंबंध स्वीकारण्यास त्यांना बराच वेळ लागला. अँड्रेने आपले नाते अनेक दिवस लपवून ठेवले होते. आंद्रेने सांगितले की, माझे पालक खूप रागावले होते, म्हणून त्यांनी केविनला पकडण्यासाठी पोलिसांना फोनही केला. परंतु नंतर पालकांना त्यांचे स्वीकारावे लागले.

दोघांनी लग्न केले

सध्या आंद्रे आणि केविन विवाहित आहेत. दोघेही सध्या कॅलिफोर्नियामध्ये राहतात.

बाळाचे नियोजन

आंद्रेने सांगितले की, ती आणि केविन एकत्र एक अद्भुत जीवन जगत आहेत. वेळ मिळेल तेव्हा ती मुलासाठी नियोजनही करत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT