YouTuber Son of a Famous Spanish actor-actress couple confessed Murdering Gay Lover In Thailand. Dainik Gomantak
ग्लोबल

Spanish Youtuber Arrested: अभिनेत्याच्या युट्यूबर मुलाला अटक; प्रियकराची हत्या केल्यानंतर तुकडे फेकले समुद्रात

सुप्रसिद्ध जोडप्याचा मुलगा नुकताच पोलिसांसोबत बेड्यांमध्ये दिसला. पोलीस त्याला समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जात होते जिथे त्याने हत्येनंतर बॉयफ्रेंडच्या शरीराते तुकडे टाकले होते.

Ashutosh Masgaunde

YouTuber Son of a Famous Spanish actor-actress couple confessed Murdering Gay Lover In Thailand: प्रसिद्ध स्पॅनिश अभिनेता आणि अभिनेत्री असलेल्या जोडप्याच्या यूट्यूबर मुलाने थायलंडच्या फुल मून पार्टी बेटावर आपल्या समलिंगी प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे.

स्पॅनिश अभिनेता रोडॉल्फो सांचो अगुइरे आणि अभिनेत्री सिल्व्हिया ब्रॉन्चालो यांचा मुलगा डॅनियल सँचो ब्रोंचालो याने कोलंबियन प्लास्टिक सर्जन एडविन अरिएटा आर्टेगा यांची थायलंडच्या कोह फा न्गान येथे गेल्या बुधवारी हत्या केली होती.

हे समलिंगी जोडपे राहत असलेल्या परिसरातील एका शेजाऱ्याने एका लँडफिलमध्ये 44 वर्षीय प्लास्टिक सर्जन एडविन अरिएटा आर्टेगाच्या शरीराचे तुकडे सापडले.

स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 29 वर्षांचा यूट्यूवर असलेला डॅनियल सँचो ब्रोंचालो 31 जुलै रोजी थायलंडला पर्यटक म्हणून गेला होता. त्याने "लैंगिक आणि पैशाच्या" वादातून अरिएटाची हत्या केल्याची कबुली अधिकाऱ्यांना दिली आहे.

डॅनियल सँचो ब्रोंचालो याने आपला प्रियकर एडविन अरिएटा आर्टेगाची (Edwin Arrieta Arteaga) हत्या करण्यापूर्वी तो हरवला असल्याची तक्रार करत बनाव केला होता.

हत्येची कबुली दिल्यानंतर डॅनियलला पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर नेले जेथे त्याने एरिटाचे विविध अवयव लपवले होते. या तपासानंतर पोलीस त्याला लवकरच न्यायालयात हजर करणार आहेत.

पोलिस लेफ्टनंट जनरल सुरापोंग थानोमजीत यांनी सांगितले की, डॅनियलवर "पूर्वनियोजित खून पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे लावले जातील.

डॅनियल सँचो ब्रोंचालो (Daniel Sancho Bronchalo) याच्या कुटुंबाची स्पेनमध्ये मोठी अभिनय परंपरा आहे. तो सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्व्हिया ब्रॉन्चालो (Silvia Bronchalo) यांचा मुलगा आहे, तर दिवंगत अभिनेते फेलिक्स अँजेल सांचो ग्रासिया (Félix Ángel Sancho Gracia) यांचा तो नातू आहे.

स्पॅनिश अभिनेता रोडॉल्फो सांचो अगुइरे (Rodolfo Sancho Aguirre) हे डॅनियल सँचो ब्रोंचालो याचे वडिल असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

डॅनियल सँचो ब्रोंचालो याला सध्या कोह सामुई बेटावरील (Island of Koh Samui) तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला असून, हा खून पूर्वनियोजित असल्याने त्याला जामीन नाकारण्यात यावा यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

SCROLL FOR NEXT