Italian Government Decided to Spend Rs 26 Crore to Combat Blue Crabs:
इटली सरकारने निळ्या खेकड्यांचा सामना करण्यासाठी सुमारे 26 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
इटलीमध्ये निळ्या खेकड्यांची संख्या खूप वाढली आहे आणि यामुळे इटलीतील अनेक जलचर (Aquatic) प्रभावित झाले आहेत. हे निळे खेकडे शेलफिश, इतर मासे तसेच ऑयस्टर यांची शिकार करतात.
इटलीच्या प्रसिद्ध डिश पास्तामध्ये ऑयस्टरचा खूप वापर केला जातो, या निळ्या खेकड्यांमुळे, ऑयस्टरचीही मोठी कमतरता भासत आहे.
निळे खेकडे सामान्यतः पश्चिम अटलांटिक समुद्रात (Atlantic Ocean) आढळतात, परंतु अलिकडच्या वर्षांत इटलीच्या किनारपट्टीवर आणि अनेक उथळ पाण्याच्या भागात किंवा तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात निळे खेकडे आढळले आहेत.
हे खेकडे मासे आणि ऑयस्टरची शिकार करतात, ज्यामुळे इटलीमध्ये सीफूडची (Sea Food) कमतरता निर्माण होत आहे.
तसेच, ऑयस्टरचा (Oyster) वापर प्रसिद्ध इटालियन डिश पास्तामध्ये (Pasta) केला जातो, निळ्या खेकड्यांमुळे ऑयस्टरच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या निळ्या खेकड्यांनी सुमारे 90 टक्के ऑयस्टरची शिकार केली आहे.
जर निळ्या खेकड्यांना लवकर नियंत्रित केले नाही तर ऑयस्टर्स लवकरच इटलीतून गायब होऊ शकतात.
कृषी मंत्री फ्रान्सिस्को लोलोब्रिगिडा यांनी नुकतीच उत्तर इटलीमधील पो नदी खोऱ्याला भेट दिली, जो निळ्या खेकड्यांनी सर्वात प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार इटली सरकारने मासेमारी सहकारी संस्था आणि एक्वाफार्मर्सना निळ्या खेकड्याची संख्या रोखण्यासाठी 26 कोटी रुपये निधी देणार आहे.
इटलीच्या समुद्रात निळे खेकडे येण्याचे आणि त्यांची संख्या वाढण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे मानले जाते की निळे खेकडे समुद्री जहाजांसह इटलीमध्ये येतात. येथे त्यांचे प्रजनन वेगाने होते.
हवामानातील बदल (Climate Change) हे निळ्या खेकड्यांच्या जलद प्रजननाचे कारण असल्याचे मानले जाते. यामुळेच इटली सरकारने आपल्या देशातील मच्छिमारांना (Fishermen's) जास्तीत जास्त निळे खेकडे पकडण्यास सांगितले आहे जेणेकरून त्यांची संख्या आटोक्यात आणता येईल.
इटालियन मच्छिमार संघटनेच्या नेत्याने सांगितले की, आता इटलीमध्ये दररोज 12 टन निळे खेकडे पकडले जात आहेत, परंतु तरीही त्यांची संख्या नियंत्रित केली जात नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.