China President Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

25 व्या वर्धापन दिनानिमित्त शी जिनपिंग देणार हाँगकाँगला भेट

Hong Kong On High Alert: शी जिनपिंग यांच्या हाँगकाँग दौऱ्यापूर्वी तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गुरुवारी हाँगकाँगला भेट देऊ शकतात. खरं तर, गुरुवारी हाँगकाँग कम्युनिस्ट चीनकडे सोपवल्याचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. (XI Jinping Hong Kong Visit news)

शी जिनपिंग यांच्या हाँगकाँग दौऱ्यापूर्वी तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहरातील काही भागांची नाकेबंदी करण्यात आली आहे. काही पत्रकारांना कार्यक्रमाला येण्यापासून रोखण्यात आले आहे. पण अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना थांबवण्यामागे कोरोना महामारी आणि सुरक्षेचे कारण सांगितले आहे.

कोरोना नंतर पहिला दौरा

जानेवारी 2020 मध्ये कोरोनाच्या (Corona) लाटेनंतर शी जिनपिंग यांचा देशाबाहेरचा हा पहिला दौरा असेल. हाँगकाँगमध्ये सहाव्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे. या भेटीदरम्यान शी जिनपिंग यांच्यासोबत आलेल्या सर्वोच्च पदावरील सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे सामाजिक संपर्क मर्यादित ठेवून दैनंदिन पीसीआर टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

* शी यांच्या भेटीदरम्यान निदर्शने रोखण्यासाठी पोलीस सज्ज

शी जिनपिंग यांच्या हाँगकाँग दौऱ्यादरम्यान कोणतेही निदर्शने होऊ नयेत यासाठी पोलीस सज्ज आहेत. राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांनी गेल्या आठवडाभरात किमान नऊ जणांना अटक केली आहे. हाँगकाँगच्या विरोधी गटांपैकी एक, लीग ऑफ सोशल डेमोक्रॅट्सने सांगितले की ते राष्ट्रीय सुरक्षा अधिकार्‍यांशी चर्चेनंतर 1 जुलै रोजी निषेध करणार नाहीत. चीनच्या हातात देश देण्याच्या वर्षपूर्तीनिमित्त हाँगकाँगमध्ये दरवर्षी शांततापूर्ण रॅली काढल्या जातात

* हाँगकाँगचा इतिहास

हाँगकाँग (Hongkong) सध्या चीनच्या (China) ताब्यात आहे. 156 वर्षे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर 1 जुलै 1997 रोजी हाँगकाँग चीनच्या ताब्यात देण्यात आले. सध्या हाँगकाँग हा दोन धोरणांखाली चालणारा देश आहे. इथले बहुतांश निर्णय इथले सरकार घेते, पण परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षणाशी संबंधित निर्णय चीन सरकार घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT