'जूगाडू नवरा भाड्याने देणे आहे', पैसे कमवण्यासाठी महिलेने लढवली शक्कल

युनायटेड किंगडममधून एक चकित करायला लावणारी घटना समोर आली आहे.
Couple
CoupleDainik Gomantak

Hire My Handy Hubby: युनायटेड किंगडममधून एक चकित करायला लावणारी घटना समोर आली आहे. वास्तविक, एका महिलेने आपल्या नवऱ्याला भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, महिलेने नवऱ्याला भाड्याने देण्यासाठी एक जाहिरातही काढली आहे, जी पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

महिलेला तिच्या नवऱ्याला भाड्याने द्यायचेय

द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव लॉरा आहे. लॉराने अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी आपल्या नवऱ्याला (Husband) भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. लॉराने जाहिरातीत लिहिले आहे की, 'माझा जुगाडू नवरा घ्या'. जाहिरातीत लॉराने आपल्या नवऱ्याचे खूप कौतुक केले आहे.

Couple
'व्लादिमीर पुतीन महिला असते तर...', बोरिस जॉन्सन यांनी साधला निशाणा

लॉराचा नवरा खूप 'जुगाडू'

लॉराच्या म्हणण्यानुसार, माझा नवरा 41 वर्षांचा असून तो खूप जुगाडू आहे. नवऱ्याने माझं जुनं घर खूप छान सजवलंय. त्याने घराच्या डिझाईनमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचे सर्वांनी कौतुक केले आहे.

महिलेचा नवरा हे काम करतो

जाहिरातीनुसार, लॉराचा नवरा रंगकाम, सजावट, टाइलिंग आणि कार्पेट घालण्याचे काम करतो. लॉराच्या पतीने जेवणाचे टेबल देखील बनवले आहे, ज्याचे तिने कौतुक केले आहे.

Couple
Russia: व्लादिमीर पुतीन यांनी ‘दुश्मन’ एलेक्सी नवलनी यांना 'दहशतवादी' म्हणून केले घोषित

लॉराने पुढे सांगितले की, 'माझ्या नवऱ्याला घरकामापासून ते बागकामापर्यंत सगळी काम येतात. त्याच्या या कौशल्याने आमचे कुटुंब अधिक पैसे कमवू शकेल असे मला वाटते.'

दुसरीकडे, लॉराने फेसबुक (Facebook) आणि नेक्स्टडोअर अ‍ॅपवर तिच्या नवऱ्याला भाड्याने देण्याची जाहिरात टाकली आहे. लॉराने सांगितले की, 'माझ्या या स्तुत्य उपक्रमाचे मोठ्या संख्येने लोकांनी कौतुक करत आहेत'.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com