Scandals Dainik Gomantak
ग्लोबल

जगातील या मोठमोठ्या सेक्स स्कँडल्समुळे पडले सरकार तर...

बोरिस जॉन्सन यांना एका कथित सेक्स स्कँडलमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दैनिक गोमन्तक

Political Sex Scandals: बोरिस जॉन्सन यांना एका कथित सेक्स स्कँडलमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र बोरिस जॉन्सन यांचा या सेक्स स्कँडलशी काहीही संबंध नव्हता. परंतु बोरिस यांनी या स्कॅंडलमधील मुख्य आरोपी नेत्याला पक्षात उपमुख्य व्हीपचे पद दिले होते. यामुळे संतापलेल्या बोरिस जॉन्सन मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी एकापाठोपाठ एक राजीनामे देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. सेक्स स्कँडलमुळे एवढी राजकीय खळबळ उडण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही सेक्स स्कँडलमुळे अनेक देशांमध्ये सरकारे कोसळली आहेत. चला तर मग अशा प्रकारच्या सेक्स स्कँडल्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे कुठेतरी सरकार पडलं तर कुणाचं करिअर संपलं.

जॅक रायन यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली

सर्वप्रथम अमेरिकेच्या (America) जॅक रायनबद्दल यांच्याबद्दल जाणून घेऊया... 2004 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. रिपब्लिकन पक्षाने त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. जॅक रायन हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. परंतु यादरम्यान त्यांची पहिली पत्नी आणि अभिनेत्री जेरी रायनने त्यांच्याशी संबंधित एक खळबळजनक खुलासा केला. जेरीने जॅक रायन यांच्यावर सेक्स क्लबमध्ये जाण्याचा आणि तिथे चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर रायन जॅक यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर त्यांच्या जागी पक्षाने अॅलन कीज यांना उमेदवारी दिली. परंतु अॅलन कीज यांना निवडणुकीत बराक ओबामा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

ओबामांच्या प्रतिस्पर्धींनी मैदान सोडले

बराक ओबामा यांचे प्रतिस्पर्धी जॉन एडवर्ड्स यांनी 2008 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विवाहबाह्य संबंधांमुळे आपली उमेदवारी मागे घेतली. जॉन एडवर्ड्स यांच्यावर विवाहित असूनही इतर महिलांशी (Women) संबंध ठेवल्याचा आरोप होता. यापूर्वी ते बराक ओबामा यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार होते. मात्र नंतर त्यांनी आपला दावा मागे घेत निवडणुकीत बराक ओबामा यांना पाठिंबा दिला.

प्रोफ्युमोच्या प्रकरणामुळे ब्रिटनचे सरकार पडले

हा खटला 1963 सालचा आहे, त्यावेळी ब्रिटनमध्ये (Britain) हेरॉल्ड मॅकमिलन यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार होते. जॉन प्रोफुमो हे मॅकमिलन सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. 19 वर्षीय मॉडेलशी लग्न होऊनही हे संबंध अवैध होते. मात्र प्रोफ्युमोने याचा इन्कार केला. नंतर पोलीस तपासात त्यांचे विवाहबाह्य संबंध खरे असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे लोक हॅरोल्ड मॅकमिलन सरकारवर प्रश्न उपस्थित करु लागले. याला कंटाळून मॅकमिलन यांनी ऑक्टोबर 1963 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT