'व्लादिमीर पुतीन महिला असते तर...', बोरिस जॉन्सन यांनी साधला निशाणा

रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्याप थांबलेले नाही.
Boris Johnson
Boris JohnsonDainik Gomantak

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्याप थांबलेले नाही. 100 दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी रशिया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालला आहे. दरम्यान, बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्लादिमीर पुतीन यांना टोमणा मारला. जॉन्सन म्हणाले, 'रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन महिला असते तर हे युद्ध सुरु झाले नसते.' (If Russian President Vladimir Putin Were A Woman There Would Be No Ukraine War Says British Pm Boris Johnson)

दरम्यान, जॉन्सन यांनी जर्मन प्रसारक ZDF शी बोलताना सांगितले की, "जर पुतिन एक महिला असते तर मला वाटत नाही की त्यांनी असे युद्ध सुरु केले असते." मुलाखतीदरम्यान, ब्रिटीश पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, 'रशिया-युक्रेन युद्ध संपावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु कोणताही करार शक्य नाही. पुतिन शांतता करारासाठी कोणताही प्रस्ताव देत नाहीत आणि झेलेन्स्की ते करार करु शकत नाहीत.'

Boris Johnson
Russia-Ukraine War: युक्रेनचे सेवेरोडोनेत्स्क शहर रशियाच्या ताब्यात जाणार

पुतिन यांच्या फोटोची खिल्ली उडवली होती

याआधी रविवारी, ग्रुप ऑफ सेव्हन (G7) च्या नेत्यांनी पुतिन यांच्या शर्टलेस फोटोची खिल्ली उडवली होती. बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आणि कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) एका व्हिडिओमध्ये पुतीन यांच्या फोटोशूटबद्दल विनोद करताना ऐकू येऊ शकतात. विनोदाची सुरुवात करत बोरिस जॉन्सन म्हणाले की, 'जॅकेट घातले आहेस? जॅकेट काढू? यावर कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'फोटो काढण्यासाठी थांबा.' यावर बोरिस जॉन्सन पुन्हा एकदा म्हणाले की, पुतीन यांना आपण सर्वांपेक्षा अधिक ताकदवान आहोत हे दाखवायचे आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com