Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

गाडीचे दार उघडले, आत होता भलामोठा प्राणी; महिलेची उडाली भंबेरी; पाहा Viral Video

Bear Inside Car Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. स्मार्ट फोन असणारे जवळजवळ सर्व लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल करताना दिसतात.

Manish Jadhav

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. स्मार्ट फोन असणारे जवळजवळ सर्व लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल करताना दिसतात. जर तुम्हीही सोशल मीडियावर असाल तर तुमच्या टाइमलाइनवरही वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट येत असतील. त्यातही अशा काही गोष्टी असतात, ज्या तूफान व्हायरल होतात, परंतु त्याशिवाय, अशा काही पोस्ट देखील व्हायरल होतात ज्या लोकांना आश्चर्यचकित करतात. आत्ताही असाच एक चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.

आधी हा व्हायरल व्हिडिओ पाहा

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला (Women) घरातून काही सामान घेऊन गाडीकडे जाताना दिसते. गाडीजवळ गेल्यानंतर तिला गाडीचा दरवाजा उघडा दिसतो त्यामुळे ती जवळ जाऊन गाडीच्या आत पाहते. तिला गाडीत असे काहीतरी दिसते जे ते पाहून घाबरुन जाते. मागे सरकून जेव्हा ती गाडीचा दरवाजा बंद करु लागते तेव्हा गाडीचा दरवाजा बंद होऊ नये म्हणून आतूनही बळाचा वापर केला जात होता. यानंतर लगेचच गाडीतून एक अस्वल उडी मारते. अस्वलाला पाहून ती दचकते. त्यानंतर अस्वल तिला हुलकावणी देऊन पळून जाते.

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @shiwani_sharma1 नावाच्या अकाउंटने पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'खूप गरम होत होते म्हणून अस्वल गाडीतील एसी चालू करुन झोपी गेले.' हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले- अस्वलालाही गाडीत बसून मजा आली. तर दुसऱ्या एकाने लिहिले- त्यालाही गरम वाटत आहे. तिसऱ्याने लिहिले- ती जंगलात (Forest) काय करत होती?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ..हेच खरे गोमंतकीय! 75 वर्षांचे आजोबा बघताबघता चढताहेत झाडावर; गोव्याचे 'बाप्पा' होताहेत सोशल मीडियावर हिट

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Crime News: इव्हेंटच्या कामासाठी बोलावलं अन् वासनेची शिकार बनवलं! मुंबईच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; राजस्थान पुन्हा हादरलं

अंमली पदार्थांच्या काळ्या पैशावर ED आणि NCB ची सर्जिकल स्ट्राईक! गोव्यासह 7 राज्यांतील 25 ठिकाणी छापेमारी; कोट्यवधींची रोकड जप्त

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येला ग्रहांचा राजा आणि मनाचा स्वामी एकत्र, 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; उजळणार नशीब

SCROLL FOR NEXT