Pregnancy Dainik Gomantak
ग्लोबल

पोटात गॅस झाल्याची समस्या घेऊन गेलेली महिला निघाली 8 महिन्यांची गर्भवती

तपासणीनंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकूण मला धक्काच बसला.

दैनिक गोमन्तक

कोणत्याही चित्र विचित्र घटना जगात कोठेही, कोणत्याही वेळी घडू शकतात. असेच काहीसं यूकेमधील (UK) रिवोनी अॅडम्ससोबत (Revoni Adams) घडले आहे. 'द सन' च्या अहवालानुसार, 22 वर्षीय रिवोनीला पोटाचा त्रासही होता. रिवोनी म्हणाली, गेली तीन वर्षे ती पोटाच्या त्रासामुळे समस्याग्रस्त होती. 'जेव्हाही मी मसालेदार अन्न किंवा कार्बोनेटेड पेये पिते तेव्हा मळमळल्या सारखे वाटते, पोट फुगणे, तीव्र वेदना जाणवणे, भूक लागल्यासारखे वाटणे यासारख्या समस्या जाणवल्या.

रिवोनी पुढे म्हणाले, 'पुन्हा एकदा असे वाटत असताना, मी ठरवले की डॉक्टरांना भेटल्यानंतर नवीन प्रिस्क्रिप्शन घेईन. तपासणीनंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकूण मला धक्काच बसला. मी डॉक्टरांना माझ्या लक्षणांबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मी गर्भवती आहे ते. एवढेच नाही तर त्यांनी पुढे सांगितले की, मी 8 महिन्यांची गर्भवती असून माझी प्रसूती कधीही होऊ शकते. ते काय म्हणत आहेत हे ऐकून मला एक मिनिट समजलेच नाही. मी डॉक्टरांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा मी त्यांना म्हणत होते की, मला गर्भधारणेची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.

रिवोनी आणि तिची जोडीदार फिटनेस फ्रीक आहेत. ते दोघेही जिममध्ये तासन् तास वेळ घालवतात. रिव्होनी पुढे म्हणाली, 'मला गर्भधारणेबद्दल बोलणे पूर्णपणे अशक्य वाटत होते, कारण मी माझी मासिक पाळी कधीही चुकवत नव्हते आणि माझे पोट पूर्णपणे बरे आहे. ना मला कधी मॉर्निंग सिकनेस वाटले, ना माझे वजन वाढले, ना माझे पोटावर काही परिणाम झाल्यासारखे वाटले. आणि हेच कारण आहे की, मी वारंवार डॉक्टरांच्या संपर्कातही होते. मी माझ्या जोडीदाराकडे पाहिले तेव्हा तो शांतपणे उभा राहिला होता.

रिवोनी पुढे म्हणाली, 'कुठेतरी मी गरोदरपणाच्या प्रकरणामुळे थोडी आनंदी होते पण मला माझ्या अपेक्षा विनाकारण वाढवायच्या नव्हत्या. मला असे वाटले की, डॉक्टरांनी माझी तपासणी करताना त्यांना काही गैरसमज झाले असतील असे मला वाटले होते. मी आणि माझा जोडीदार डॉक्टरांकडून जाताना फक्त शांत होतो, मग त्यानंतर अचानक हसून तो म्हणाला की, आता मी समजू शकतो की गेल्या काही दिवसांपासून तुला मसालेदार गोष्टी का आवडत होते. रिवोनी गेल्या 2 वर्षांपासून तिच्या पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

तसेच, रिवोनी म्हणाली, 'मी 8 महिन्यांची गर्भवती आहे, हे मान्य करायला तयार नव्हते. कल्पना करा की तुम्ही गॅसची समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेलात आणि तुम्हाला डॉक्टर सांगतात की, तुम्ही मुलाला जन्म देणार आहात तर तुम्हाला कसे वाटेल. तथापि, जेव्हापासून मला गर्भधारणेबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून मला काही लक्षणे जाणवू लागली. प्रसूतीसाठी फक्त काही आठवडे शिल्लक आहेत, मात्र माझ्या पोटाचा आकार वाढत होता. रिवोनी पुढे म्हणते की, मी आणि माझा जोडीदार अद्याप मुलासाठी पूर्णपणे तयार नाही.

शिवाय, रिवोनी म्हणाले, 'करिअर, आर्थिक प्रगती आणि आरोग्य या तीन जबाबादारी शिवाय आम्ही अद्याप कोणताही नवीन जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही. आम्हाला आमच्या नात्याला आणखी काही वेळ द्यायचा होता. हे सत्य स्वीकारायला मला थोडा वेळ लागला पण आता मी माझ्या गर्भधारणेबद्दल खूप उत्साहित आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी माझ्या मुलाच्या जन्माची चातकासारखी वाट पाहत आहे. माझी प्रसूती तारीख जवळ आली आहे, आणि लवकरच माझ्या बाळाचा जन्म येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT