जगभरात अजूनही अशा अनेक अदिम जमाती आहेत, ज्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून खूपच दूर आहेत. या जमातींचे स्वतःचे वेगवेगळे नियम आणि परंपराही आहेत. तसेच त्यांचे चित्र विचित्र विधी देखील आपल्याला आश्चर्यचकित करणारे वाटतात. या आदिम जमातीपैकीच एक जमात म्हणजे पश्चिम केनियाची लुओ टोळी (Luo Tribes). त्यांना 'जोनागी' / 'ओनागी' असेही म्हणतात. ते उत्तर युगांडा (Uganda) आणि उत्तर टांझानिया (Tanzania) प्रदेशात देखील आढळतात. लुओ लोक त्यांच्या विलक्षण परंपरा आणि सांस्कृतिक पद्धतींसाठी ओळखले जातात.
मृतांसोबत शरीरसंबंध ठेवणे
फार वर्षापूर्वी लुओ लोकांमध्ये एक प्रथा होती ज्यात पतीचा मृतदेह दफन करण्यापूर्वी पतीच्या मृतदेहासह एकाच खोलीत त्या विधवेला ठेवले जायचे. त्या विधवेकडून अशी अपेक्षा केली जात असे की, तीने आपल्या मृत पतीवर खूप प्रेम केले पाहिजे. स्त्रियांच्या शुद्धीकरणासाठी ही प्रथा आवश्यक मानली जाते असे.
विशेष ठिकाणी शरीरसंबंध ठेवणे
लुओ जमातीमध्ये शरीरसंबंध काही विशिष्ट ठिकाणीच ठेवले जातात. यामध्ये, स्त्रिया वादाच्या वेळी काठीने आपल्या पतींना मारु शकत नाहीत आणि असे झाल्यास, घरातील वडिलधाऱ्यांकडून त्याचे निराकरण करण्यासाठी एक विशेष विधी केला जातो. यामध्ये त्या दोघांना 'मन्यासी' नावाचे हर्बल पेय पिण्यासाठी दिले जाते. यानंतर, दोघांमधील तणाव दूर करण्यासाठी, शारीरिक संबंध ठेवण्याचे सांगण्यात येते.
या व्यतिरिक्त, जेव्हा पिक कापणीची वेळ येते तेव्हा देखील शारीरिक संबंध ठेवणे आवश्यक मानले जाते. लुओ जमातीमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा आहे, परंतु लुओ मनुष्याला पिकांची लागवड किंवा कापणीच्या आदल्या रात्री त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवणे आवश्यक मानले जाते. दुसऱ्या प्रथेनुसार, जेव्हा एखादा मुलगा लग्नानंतर त्याच्या पत्नीबरोबर घरामध्ये येतो, तत्पूर्वी त्याच्या आईवडिलांनी त्याच्या शयनकक्षामध्ये शारिरीक संबंध ठेवणे क्रमाप्राप्त आहे. त्यानंतरच तो आपल्या पत्नीशी संबंध ठेवू शकणार. लुओ जमातीमध्ये हा नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्याचा एक मार्ग मानला जातो.
मोठ्या भावाच्या आणि बहिणीच्या आधी लग्न करु नये
लुओ जमातीच्या दुसऱ्या प्रथेनुसार येथील मुली त्यांच्या मोठ्या बहिणीच्या आधी लग्न करु शकत नाहीत. जो आपल्या मोठ्या बहिणीशी संबंध ठेवतो किंवा लग्न करतो त्याला समाजातून बहिष्कृत केले जाते. ज्या स्त्रिया वर शोधण्यात जास्त वेळ घालवतात त्यांना लग्नासाठी भाग पाडले जाते जेणेकरुन त्यांच्या लहान भावंडांचे लग्न होऊ शकेल. आधी मोठ्या बहिणीचं लग्न करण्यामागील कारण म्हणजे तीचा कुटुंबात किंवा गावात आदर राखला जाईल.
या प्रथेचा एक नकारात्मक पैलू म्हणजे लग्नासाठी तयार नसतानाही, त्यांना लहान भावंडांच्या आगोदर लग्न करावे लागते. जर लहान बहिणीने तिच्या मोठ्या बहिणीच्या आधी लग्न केले तर, वधूचा हुंडा तिच्या वडिलांना दिला जात नाही. त्याऐवजी, वर वधूच्या काकांना हुंडा देण्यात येतो. त्याचप्रमाणे, जर लहान भाऊ त्याच्या मोठ्या भावाच्या आधी लग्न करत असेल, तर मोठा भाऊ लहान भावाच्या पत्नीने शिजवलेले अन्न कधीच खात नाही. याशिवाय, दोन्ही भाऊ एकत्र बसूनही अन्न खाऊ शकत नाहीत.
आत्महत्या करणाऱ्यांना फ्लॉजिंग
लुओ जमातीमध्ये आत्महत्या हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कठोर शिक्षा दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला फाशी दिली तर त्याचा मृतदेह खाली उतरविण्यापूर्वी त्याला चाबकाचे फटके मारले जातात. आत्महत्या करणाऱ्यांचा मृतदेह घराबाहेर 'गुंडा' नावाच्या ठिकाणी पुरला जातो. त्याचा मृतदेह सामान्य लोकांपासून दूर ठेवला जातो कारण त्याचा दुष्ट आत्मा घरी परत येऊ नये, म्हणून मृतदेह एका बॉक्समध्ये ठेवण्यात येतो.
याशिवाय, आत्महत्या करणाऱ्यांना त्याच रात्री पुरले जाते मात्र त्याच्या मृत्यू झाला म्हणून शोक पाळला जात नाही. असे मानले जाते की, त्याचा दुष्ट आत्मा शोक करणाऱ्यांना त्रास देऊ शकतो. घटस्फोटित किंवा अविवाहित महिला ज्या आत्महत्या करतात त्यांना 'मिगोगो' म्हणतात. लुओ प्रथेनुसार, अशा महिलांना त्यांच्या मावशीच्या घरी देखील दफन केले जाऊ शकते.
सुंता न झालेल्या महिलांचा त्याग करणे
दुसऱ्या प्रथेनुसार, लुओ जमातीत सुंता न झालेल्या स्त्रियांना विचित्र आणि उपहासात्मक मानले जाते. येथे महिलांची सुंता करणे बंधनकारक आहे. असे मानले जाते की, ज्या स्त्रिया सुंता करण्यास नकार देतात त्यांना शाप दिला जातो. पुरुष स्वतःला अशा स्त्रियांपासून दूर ठेवतात. जर एखाद्या स्त्रीने सुंता न करता लग्न केले तर तिला शेतांपासून दूर ठेवले जाते. त्याशिवाय जर ती शेतात गेली तर सर्व पिके आणि भाज्या सुकतील अशी अख्यायिका मानण्यात येते.
ज्या महिलांची सुंता झालेली नाही त्यांना सासू-सासरे आपल्या घरी येऊ देत नाहीत. तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्नही शिजवता येत नाही. त्यांच्यासाठी असे करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच सुंता न झालेल्या स्त्रीशी लग्न करण्यास या जमातीतील लोक घाबरतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.