"पाकव्याप्त काश्मीर (POK) परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे." असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी केले आहे.
भारतीय काश्मीरचा बळकावलेला भाग मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडे आहे. पाकव्याप्त काश्मीर अशी ओळख असलेल्या या भागाचा वाद बऱ्याच काळापासून धुमसत आहे. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक विधान केलं होतं. त्यानंतर आता लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पाकव्याप्त काश्मीरचा लवकरच भारतात समावेश केला जाईल, असे राजनाथ सिंह म्हणाले होते. तर आता POK परत घ्यायला सज्ज असल्याचे वक्तव्य लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे.
काय म्हणाले लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी?
"पाकव्याप्त काश्मीरबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवण्यात आला आहे. यात काहीही नवीन नाही. तो संसदेच्या प्रस्तावाचा एक भाग आहे. आता उरला प्रश्न भारतीय सैन्यांचा… तर भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. याबाबतचा जेव्हा आदेश दिला जाईल, तेव्हा आम्ही पूर्ण तयारीने पुढे जाऊ."
उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले, केंद्राने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 ऑगस्ट 2019 मध्ये रद्द केले, त्यानंतर जम्मू काश्मीरच्या सुरक्षेत मोठा बदल झाला असून, दहशतवादी कारवायांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळाले आहे. तसेच, सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सुमारे 300 दहशतवादी आहेत, पण या कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खात्री आम्ही देऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.