Himanta Biswa Sarma: 'राहुल गांधी सद्दाम हुसेनसारखे दिसू लागले...,' हिमंता बिस्वांनी लगावला टोला

Himanta Biswa Sarma Statement: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Himanta Biswa Sarma Statement: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. त्यांनी राहुल गांधींची तुलना इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेनशी केली आहे. सरमा म्हणाले की, 'राहुल गांधींचा चेहरा सद्दाम हुसेनसारखा दिसू लागला आहे.' गुजरातमधील निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी मंगळवारी हे वक्तव्य केले.

सीएम हिमंता यांचे संपूर्ण वक्तव्य

राहुल गांधींची (Rahul Gandhi) खिल्ली उडवत हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, 'गांधी वंशजांची प्रतिमा महात्मा गांधी किंवा सरदार पटेल यांच्यासारखी असली पाहिजे, इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यासारखी नाही.'

Rahul Gandhi
Gujrat Assembly Elections: गुजरात निवडणुकीतील PM मोदींच्या मॅरेथॉन रॅलींना आजपासून सुरुवात

सीएम हिमंता पुढे म्हणाले की, 'आता मी पाहिले की, त्यांचा (राहुल गांधी) चेहराही बदलला आहे. चेहरा बदलणे ही वाईट गोष्ट नाही. तुमचा चेहरा बदलायचा असेल तर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरु किंवा गांधीजींसारखा करा, पण तुमचा चेहरा सद्दाम हुसेनसारखा का होत आहे.'

राहुल गांधींवर हल्लाबोल करताना हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, 'राहुल गांधी गुजरातमध्येही (Gujarat) दिसत नाहीत. हिमाचलमधली निवडणूक संपली पण ते तिथेही गेले नाहीत. ज्या राज्यांमध्ये निवडणुका नाहीत, तिथे राहुल गांधी जातात. मात्र, जिथे निवडणूक असते तिथे ते (राहुल गांधी) जात नाहीत, कारण त्यांना पराभवाची भीती सतावते. परंतु, ते जिथे जातील तिथे हरणार हे त्यांना माहीत आहे, त्यांच्याकडून जिंकण्याची कोणतीही अपेक्षा नाही.'

Rahul Gandhi
विधानसभा निवडणुकीआधी गुजरात सरकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे 'गिफ्ट'

तसेच, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 2 डिसेंबरला 93 जागांवर मतदान होणार आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत.

Rahul Gandhi
Gujarat-Himachal Election: गुजरात, हिमाचलमध्ये 'इतके' कोटी रूपये जप्त

दुसरीकडे, 7 सप्टेंबरपासून सुरु झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 1 डिसेंबरला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पोहोचणार आहे. या प्रवासात राहुल गांधी 12 राज्ये आणि 3500 किमीचा प्रवास करतील. 3 डिसेंबरला ही यात्रा राजस्थानमध्ये दाखल होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com