Aam Aadmi Party: 'आप' आमदाराला कार्यकर्त्यांनीच दिला चोप, Video Viral

Aam Aadmi Party MLA Gulab Singh Yadav: आम आदमी पार्टीचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Gulab Singh Yadav
Gulab Singh YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Aam Aadmi Party: आम आदमी पार्टीचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठच्या सुमारास आमदार श्याम विहार येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सभेदरम्यान वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावर आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Gulab Singh Yadav
Kumar Vishwas: कुमार विश्वास यांना जीवे मारण्याची धमकी, केजरीवाल यांच्या विरोधात न बोलण्याचा इशारा

दुसरीकडे, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आमदारसाहेब स्वतःला वाचवण्यासाठी सभेच्या ठिकाणाहून पळ काढत आहेत, तर काही लोक त्यांचा पाठलाग करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भारतीय जनता पक्षाने (BJP) आम आदमी पार्टीवर तिकीट विकल्याचा आरोप केला आहे.

तसेच, भाजपच्या प्रवक्त्याने ट्विट करत म्हटले की, 'आप'चा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की, त्यांचे सदस्यही आपल्या आमदारांना सोडत नाहीत! आगामी एमसीडी निवडणुकीतही (Election) अशाच निकालांची प्रतीक्षा आहे. 'आप'च्या आमदाराला मारहाण झाल्याचे ट्विट दिल्ली भाजपने केले आहे. तिकीट विकल्याच्या आरोपावरुन आम आदमी पार्टीचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. केजरीवाल जी, याप्रमाणे 'आप'च्या सर्व भ्रष्ट आमदारांचा नंबर येईल.

Gulab Singh Yadav
Video: गुजरातमधील विकासकामांसाठी या महिलेने दिला PM मोदींना आशीर्वाद, 'समुद्रात पाणी असेपर्यंत...'

त्याचवेळी, आमदार गुलाब यादव यांनी या संपूर्ण घटनेवर ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लिहिले की, 'भाजप हतबल झाला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com