Why 43 lakhs Americans quiet their jobs  Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेत 43 लाख लोकांचा नोकरीला रामराम;पहा काय आहे नेमकं कारण

अमेरिकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी 2.9 टक्के लोकांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. जे दर्शवते की लोकांनी विक्रमी पातळीवर राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना (COVID-19) नंतर अमेरिकेत (America) आता एक नवीन संकट उभे टाकले आहे. सध्या अमेरिकेत विक्रमी संख्येने लोक नोकरी सोडत आहेत (Job Resignations). अमेरिकेच्या कामगार विभागाच्या जॉब ओपनिंग आणि लेबर टर्नओव्हर सर्वेक्षणने दिलेल्या महितीनुसार ऑगस्टमध्ये नोकरी सोडणाऱ्या अमेरिकन (Americans) लोकांची संख्या 4.3 दशलक्ष झाली आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांपैकी 2.9 टक्के लोकांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. जे दर्शवते की लोकांनी विक्रमी पातळीवर राजीनामा दिला आहे. याआधी एप्रिलमध्ये 40 लाख आणि मे महिन्यात 36 लाख लोकांनी नोकरी सोडली होती.(Why 43 lakhs Americans quiet their jobs)

दरम्यान, ऑगस्टमध्ये, अमेरिकेत नवीन नोकऱ्यांची संख्या देखील कमी होऊन 10.4 लाख इतकी झाली आहे , परंतु अमेरिकेत जुलैपासूनसिच नोकऱ्यांच्या संधी कमी होताना दिसत आहेत. अमेरिकेत नोकरी सोडणाऱ्या लोकांची मोठी संख्या दाखवते की त्यांना नोकरीच्या संभाव्यतेबद्दल किती आत्मविश्वास आहे. डेटाची सखोल तपासणी केल्यानंतर, असे देखील आढळून आले की लोक कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराबद्दल देखील घाबरले आहेत.

लोकांनी नौकरी सोडल्याने अनेक क्षेत्र प्रभावित झाले आहेत. रिटेल, हॉस्पिटैलिटी, ट्रांसपोर्टेशन,असे अनेक सेक्टर प्रभावित झाले आहेत. त्याचबरोबर अन्न पुरवठा क्षेत्रालाही कामगारांचा मोठं अफाटक बसताना दिसत आहे. ऑगस्टमध्ये, या क्षेत्रातील जवळपास 892,000 लोकांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नोकरी सोडली आहे .

गेल्या एका महिन्यात ही संख्या 157,000 होती. नोकरी आणि रिक्त पदे सोडून जाणाऱ्या लोकांची वाढती संख्या ही देशाच्या आर्थिक सुधारणात अडथळा असल्याचे दिसते आहे . नोकरी सोडण्याचा हा दर गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक असल्याचे देखील म्हटले जात आहे .

अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत जवळपास 22 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्याचे कारण म्हणजे लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. असे असूनही, आता सुमारे 50 लाख नोकऱ्या रिक्त आहेत आणि व्यापाऱ्यांना नवीन कामगार देखील मिळत नाही. लहान व्यवसाय करणारे सुमारे 51 टक्के लोक म्हणतात की त्यांनी सप्टेंबरमध्ये नोकऱ्या काढल्या होत्या परंतु ही पदे भरली जाऊ शकली नाहीत.लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या चांगला बोनस आणि जास्त पगार द्यायला देखील तयार आहेत.

अमेरिकेतील लोकं नेमकी नोकरी का सोडत आहेत असे प्रश्न देखील सर्वांना पडत आहेत पण याच मुख्य कारण आता समोर आलं आहे. ते म्हणजे कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती, बाल संगोपन पर्यायांचा अभाव आणि अमेरिकन सरकारकडून प्रोत्साहन स्वरूपात देण्यात येणारी मदत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे सरकार लोकांना साथीच्या आजारातून सावरण्यास मदत करत आहे यामुळे अमेरिकन लोक आपली नोकरी सोडत आहेत. 1.16 कोटीहून अधिक लोक आणि त्यांचे कुटुंब सरकारच्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमावर अवलंबून आहेत. सरकारने लाखो लोकांना कोविड रिलीफ चेक, भाडे स्थगिती आणि विद्यार्थी कर्जमाफी देखील दिली आहे. यामुळे त्यांना घरखर्च चालवण्यात कोणतीही अडचण येत नाही.आणि याचमुळे लोक आपली नोकरी सोडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT