Omans Grand Mufti  Dainik Gomantak
ग्लोबल

कोण आहेत ओमानचे ग्रँड मुफ्ती, ज्यांनी अरबमध्ये भाजपविरोधात खोलला मोर्चा

ओमान (Oman), कतार, कुवेत, बहारीन आणि इराणसह अनेक देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत भाजपच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कठोर शब्दात टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

ओमान, कतार, कुवेत, बहारीन आणि इराणसह अनेक देशांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेत कठोर शब्दात टीका केली आहे. यानंतर भाजपने नुपूर शर्मा आणि दिल्लीचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. हे वादग्रस्त वक्तव्य नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून अरब देशांमध्ये त्यावर प्रचंड आक्षेप घेण्यात आला होता. (who is omans grand mufti protest against bjp india for prophet muhammad controversy)

खरं तर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अरब देशांमध्ये भाजपविरोधात ट्रेंड सुरु झाला आणि भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली. ही मोहीम सुरु करण्याचे श्रेय ओमानच्या ग्रँड मुफ्तींना जाते. ओमानचे (Oman) ग्रँड मुफ्ती शेख अहमद बिन हमाद अल खलीली हे अरब देशांमध्ये भाजपविरोधात (BJP) ट्विट करुन हे अभियान सुरु करणारे पहिले होते. त्यांनी लिहिले की, भाजपने पैगंबर मोहम्मद यांच्यावर अश्लील टिप्पणी केली आहे.

ओमानचे ग्रँड मुफ्ती कोण आहेत

ओमानचे ग्रँड मुफ्ती अहमद अल खलीली हे 79 वर्षांचे आहेत. इस्लामिक मुद्द्यांवर ते आपले मत मांडत असतात. अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्याबद्दल त्यांनी तालिबानचे अभिनंदन केले होते. हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले होते. ओमानमध्ये दारुवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. एवढेच नाही तर ग्रँड मुफ्तींना पाकिस्तानचे समर्थक मानले जातात. त्यांना पाकिस्तानचा (Pakistan) सर्वोच्च नागरी पुरस्कार 'निशान-ए-पाकिस्तान' देखील मिळाला आहे.

भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्याबाबत ओमानचे ग्रँड मुफ्ती म्हणाले की, 'हा असा मुद्दा आहे, ज्याच्या विरोधात सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र आले पाहिजे.' अल खलिलींच्या वक्तव्यानंतर अरब देशांमध्ये भारताचा (India) विरोध झाला होता. यानंतर भाजपने स्पष्टीकरण देत नेत्यांची हकालपट्टी केली.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या असलेल्या नुपूर शर्माने एका खासगी टीव्ही चॅनलच्या पॅनलमध्ये भाग घेतल्यापासून हे संपूर्ण प्रकरण सुरु झाले. ज्यामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या वादावर चर्चा होत होती. यादरम्यान नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा वाद सुरु झाला. प्रेषित मुहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT