Maria Corina Machado Dainik Gomantak
ग्लोबल

Maria Corina Machado: धमक्या, अटक आणि राजकीय छळ, दडपशाही राजवटीला दिलं आव्हान; शांततेचा नोबेल मिळणाऱ्या कोण आहेत मारिया कोरिना मचादो?

Nobel Peace Prize Winner: यंदाचा (2025) नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचादो यांना जाहीर झाला.

Manish Jadhav

Who Is Maria Corina Machado: यंदाचा (2025) नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचादो यांना जाहीर झाला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र शुक्रवारी (10 ऑक्टोबर) जेव्हा मचादो यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा ट्रम्प यांचे स्वप्न भंगले. लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मचादो यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना पुरस्कराच्या रुपात मिळाली.

"हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांततापूर्ण संक्रमण घडवून आणण्याच्या त्यांच्या संघर्षाबद्दल" हा सन्मान त्यांना देण्यात आला. पुरस्काराची घोषणा करताना समितीने म्हटले की, "2025 चा नोबेल शांतता पुरस्कार शांततेच्या एका धाडसी आणि समर्पित योद्ध्याला दिला जात आहे.''

शांततेच्या लढ्यात 'आशेच्या प्रतीक'

दरम्यान, या घोषणेपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हा पुरस्कार मिळण्याची अटकळ होती, मात्र ट्रम्प यांना मागे टाकत मचादो यांची निवड करण्यात आली. मारिया कोरिना मचादो या व्हेनेझुएलामधील लोकशाहीवादी चळवळीतील एक लोकप्रिय नेत्या आहेत. लॅटिन अमेरिकेत नागरिकांच्या धैर्याचे त्या एक शक्तिशाली प्रतीक मानल्या जातात. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी निकोलस मादुरो (Nicolás Maduro) यांच्या दडपशाही राजवटीला आव्हान दिले. या संघर्षात त्यांना धमक्या, अटक आणि राजकीय छळ सहन करावा लागला.

राजकीय फूट संपुष्टात आणणाऱ्या नेत्या

नोबेल समितीने मारिया मचादो यांचे वर्णन 'एकीकरणाची शक्ती' (Unifying Force) असे केले. त्यांच्या नेतृत्वाने एकेकाळी विखुरलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणले आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर संघटित केले.

2024च्या व्हेनेझुएला निवडणुकीत मादुरो राजवटीने मचादो यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर त्यांनी विरोधी प्रतिनिधी एद्मुंडो गोन्झालेझ उरुटिया (Edmundo González Urrutia) यांना पाठिंबा दिला. सरकारने विरोधाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला असतानाही त्या समर्थपणे उभ्या राहिल्या. मतदान केंद्रांवर नजर ठेवणे, मतांची नोंद करणे आणि निवडणूक फसवणूक उघड करणे या कामात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली.

समितीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, "मारिया कोरिना मचादो यांनी दाखवून दिले की लोकशाहीची साधने हीच शांततेची साधने आहेत. त्या एका वेगळ्या भविष्याची आशा मूर्त रुप देत आहेत, जिथे नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षित केले जातील आणि त्यांचा आवाज ऐकला जाईल."

कोण आहेत मारिया कोरिना मचादो?

राजकीय पार्श्वभूमी: त्यांनी 2013 मध्ये वेंते व्हेनेझुएला (Vente Venezuela) या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या 2010 ते 2015 पर्यंत नॅशनल असेम्बीलीच्या (National Assembly) सदस्य होत्या.

संस्थापक: मुक्त निवडणुकांचे समर्थन करणाऱ्या सुमते (Súmate) या नागरी गटाची स्थापना करण्यात आणि लोकशाही संक्रमणाचे समर्थन करणाऱ्या सोयव्हेनेझुएला (SoyVenezuela) या आघाडीची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता.

आंतरराष्ट्रीय सन्मान: त्यांना बीबीसीच्या 100 सर्वात प्रभावशाली महिलां (2018) मध्ये स्थान मिळाले. तसेच, चार्ल्स टी. मॅनाट पुरस्कार (2014) आणि लिबरल इंटरनॅशनल फ्रीडम प्राइज (2019) यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT