Population Dainik Gomantak
ग्लोबल

Report: जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या राहते 'या' 20 शहरात!

तुम्हाला माहिती आहे का लोकसंख्येनुसार जगातील 20 सर्वात मोठी शहरे कोणती आहेत? वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती शेअर केली आहे.

Manish Jadhav

तुम्हाला माहिती आहे का लोकसंख्येनुसार जगातील 20 सर्वात मोठी शहरे कोणती आहेत? वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती शेअर केली आहे.

या आकडेवारीनुसार, लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठे शहर जपानचे टोकियो-योकोहामा आहे. येथील लोकसंख्या 37.73 दशलक्ष आहे.

इंडोनेशियाचे जकार्ता शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची लोकसंख्या 33.75 दशलक्ष आहे. भारताची राजधानी दिल्ली 32.22 दशलक्ष लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर 26.94 दशलक्ष लोकसंख्या असलेले ग्वांगझो फोशान आणि पाचव्या क्रमांकावर भारतातील (India) मुंबई शहर आहे, ज्याची लोकसंख्या 24.97 दशलक्ष आहे. मनिला 24.92 दशलक्षांसह सहाव्या क्रमांकावर आणि 24.07 दशलक्षांसह शांघाय सातव्या क्रमांकावर आहे.

23.08 दशलक्षांसह साओ पाउलो आठव्या क्रमांकावर आणि 23.01 दशलक्षांसह सोल-इंचॉन नवव्या क्रमांकावर आहे. दहाव्या क्रमांकावर मेक्सिको सिटी आहे, ज्याची लोकसंख्या 21.80 दशलक्ष आहे.

न्यूयॉर्क आणि बीजिंगची लोकसंख्या किती आहे?

दुसरीकडे, न्यूयॉर्कची लोकसंख्या 21.50 दशलक्ष, कैरो- लोकसंख्या 20.29 दशलक्ष, ढाका- लोकसंख्या 18.62 दशलक्ष बीजिंग- लोकसंख्या 18.52 दशलक्ष, कोलकाता- लोकसंख्या 18.50 दशलक्ष, बँकॉक- लोकसंख्या 18.00 दशलक्ष, शेन्झेन-लोकसंख्या 17.61 दशलक्ष, मॉस्को (Moscow)-लोकसंख्या 17.33 दशलक्ष, ब्यूनस आयर्स लागोसची लोकसंख्या 16.61 दशलक्ष एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT