ब्राझीलच्या फेडरल पोलिसांनी आपल्याच देशाच्या लष्करातील 8 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे लष्करात खळबळ उडाली आहे.
ब्राझिलियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ब्राझिलियातील सरकारी इमारतींवर 8 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात उजव्या विचारसरणीच्या दंगलखोरांना मदत केल्याच्या आरोपावरुन सात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सरकारी वकिलांचे म्हणणे आहे की, अधिकार्यांच्या मोबाईल फोनमधील मेसेजवरुन अधिकाऱ्यांना हल्लेखोरांचा हेतू माहित होता. असे असूनही त्यांनी ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि सर्वकाही होऊ दिले.
राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पदच्युत करण्यासाठी आणि माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना सत्तेवर आणण्यासाठी दंगलखोरांच्या प्रयत्नांना त्यांनी मदत केली.
दरम्यान, अधिकाऱ्यांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अटक करण्यात आलेल्या अधिकार्यांमध्ये क्लेप्टर रोझा गोन्साल्विस, ब्राझिलियाच्या लष्करी पोलिसांचा जनरल कमांडर आहे. पोलिसांनी (Police) आणखी तिघांनाही ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, सरकारी वकिलांनी सांगितले की लष्करी अधिकार्यांना माहित होते की आंदोलकांचा राजधानीवर हल्ला करण्याचा आणि देशाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या कायदेशीरतेबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा हेतू आहे.
8 जानेवारी रोजी दंगलखोरांनी सुप्रीम कोर्ट (Supreme Court), राष्ट्रपती भवन आणि इतर सरकारी इमारतींवर हल्ला केला. बंडखोरांच्या हल्ल्यापूर्वी राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने तीन इमारतींची सुरक्षा वाढवण्याची शिफारस सातत्याने केली होती.
दंगलीनंतर मोठ्या प्रमाणात हल्लेखोर आणि काही माजी सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.