Afghanistan Currency Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या पैशामागं दडलंय UK कनेक्शन

तालिबानने अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतला असून अशा परिस्थितीत, आगामी काळात अफगाणिस्तानच्या चलनाची घसरण किंवा अस्थिरतेबद्दल जोरदार चर्चा आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबानने अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतला असून अशा परिस्थितीत, आगामी काळात अफगाणिस्तानच्या चलनाची घसरण किंवा अस्थिरतेबद्दल जोरदार चर्चा आहे. तथापि, युद्धग्रस्त देशावर संकट असूनही, चलन आतापर्यंत स्थिर राहिले आहे. अफगाणिस्तान आपले चलन (Afghanistan Currency) देशात नाही तर बाहेरच्या देशात छापतो. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचे चलन कसे आहे, कुठे आणि कसे छापले आहे ते जाणून घेऊया.

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी घेतल्यानंतर (Taliban Capture of Afghanistan) तेथील बँका आणि चलनांच्या स्थितीबाबत खूप गोंधळ आहे. बँकांमधून पैसे काढण्यासाठी अफगाण लोक (Afghan People) अडचणींचा सामना करत आहेत. अफगाणिस्तानच्या चलनाचे नाव अफगाणी आहे. एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये अफगाण रुपया चालत असे, परंतु 1925 मध्ये अफगाणी हे नवीन चलन देशात आले.

अफगाणिस्तान बँक' ही देशाची मध्यवर्ती बँक

अफगाणिस्तान बँक (Afghanistan Bank) म्हणून ओळखली जाणारी मध्यवर्ती बँक (Central Bank) अफगाणिस्तानच्या चलनाची छपाई, वितरण आणि नियंत्रणासाठी जबाबदार आहे. या बॅंकेची स्थापना 1939 मध्ये करण्यात आली होती. या बँकेचे मुख्यालय काबूलमध्ये (Kabul) आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून या बँकेच्या प्रमुखांचे पद रिक्त आहे. तालिबान्यांनी यापूर्वी सत्ता काबीज केली तेव्हा त्यांनी चलन व्यवहाराचं साधन अफगाणी रुपयाचा वापर सुरू ठेवला. त्या वेळी अफगाण रुपयाचे मोठ्याप्रमाणात अवमूल्यन झाले होते. यावेळीही अशीच काहीशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इंग्लंडमध्ये छापले जाते अफगाणिस्तानचे चलन

इंग्लंडमधील (England) बेसिंगस्टोक (Basingstoke) येथील जगातील सर्वात मोठ्या खाजगी चलन छापखान्यात अफगाणिस्तानचे चलन छापले जाते. जगातील 140 देशांचे चलन येथे छापले जाते. अफगाणिस्तानचे चलन सध्या येथे छापले जात आहे. 80 च्या दशकात अफगाणिस्तानचे चलन एका रशियन कंपनीने छापले होते. परंतु जेव्हा 2002 मध्ये हमीद करझाई (Hamid Karzai) यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानात नवीन लोकशाही सरकार स्थापन झाले तेव्हा ते एका यूके कंपनीला देण्यात आले.

अफगाणी नोटची सुरक्षा मानक खूप मजबूत आहे

असे मानले जाते की, ब्रिटनच्या या चलन प्रेसने अफगाणिस्तानच्या नोटची रचना देखील केली आहे. त्याचे सुरक्षा मानक खूप मजबूत आहे. त्यामुळे बनावट नोटा बनवण्याची किंवा छापण्याची शक्यता फारच कमी आहे. 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000 च्या संख्यांमध्ये अफगाण नोट छापल्या जातात.

अफगाणी रुपयाचे मूल्य काय आहे?

तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये खूप गोंधळ झाला आहे. युद्धग्रस्त देश सोडण्यासाठी लोकांची धावपळ सुरु आहे. विमानतळाबाहेर लोकांची गर्दी आहे, जे देश सोडण्याची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर त्याचा परिणाम आता इथल्या चलनावरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय रुपयाशी तुलना करण्याबद्दल बोलताना, सध्या भारताचे 100 रुपये 115 अफगाणी रुपयांच्या बरोबरीचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT