Marriage Dainik Gomantak
ग्लोबल

लग्न करायचं, पण एकत्र राहायचं नाही तरीही नातं टिकवायचं; जपानमधील 'या' ट्रेंडची जगभर चर्चा

What is separation marriage: अमेरिका आणि कॅनडामध्ये 40-50 टक्के विवाह घटस्फोटामुळे मोडतात, तर जपानमध्ये हे प्रमाण केवळ 1.2% आहे.

Manish Jadhav

Separation Marriage: जगभरात लग्न मोडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. लग्नाला साता जन्माचे बंधन मानल्या जाणाऱ्या भारतातही घटस्फोटाच्या बातम्या रोज समोर येत आहेत.

प्यू रिसर्च सेंटरच्या अलीकडील अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेतील सुमारे 50% विवाह घटस्फोटामुळे मोडतात. 1960 पासून वाढलेला घटस्फोटाचा हा ट्रेंड प्रत्येक खंडात दिसून येत आहे.

संशोधनानुसार, मालदीवसारख्या छोट्या देशातही घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. रशिया, अमेरिका, कॅनडा, जॉर्जिया, चीन, युक्रेन, जपान आणि कोस्टा रिका असे अनेक देश आहेत, जिथे घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत.

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये 40-50 टक्के विवाह घटस्फोटामुळे मोडतात, तर जपानमध्ये हे प्रमाण केवळ 1.2% आहे.

जपानमधील अनोखा प्रयोग

जपानमध्ये (Japan) घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे, परंतु येथून सुरु झालेला विभक्त होण्याचा ट्रेंड जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहे. खरे तर, शेकडो जपानी जोडपी एकाच शहरात राहूनही वेगळी राहतात आणि वीकेंडला भेटतात.

असे मानले जाते की, यामुळे तणाव आणि घटस्फोटाचे प्रमाण दोन्ही कमी होऊ शकते. जपानी लोकांना या सूत्राला एक नाव दिले आहे. याला 'सोत्सुकोन' म्हणतात, ज्यामध्ये एक जोडपे कायदेशीररित्या विवाहित असूनही स्वतंत्र जीवन जगते.

सेपरेशन मॅरेज किती प्रभावी आहे?

अशा विवाहांचे समर्थक म्हणतात की, जपानी लोक एकमेकांना स्पेस देण्यावर विश्वास ठेवतात. पती-पत्नीच्या नात्यातील ही स्पेस टिकवून ठेवण्यासाठी येथे नवा प्रयोग केला जात आहे.

यामध्ये हे जोडपे लग्नानंतरही बहुतांश वेळ वेगळे राहत आहेत. जेणेकरुन त्यांची प्रायव्हसी आणि स्वातंत्र्य राखले जाईल, तर त्यांच्यातील प्रेम देखील अबाधित राहू शकेल.

तथापि, घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी हा ट्रेंड खरोखर प्रभावी आहे की, नाही, यासंबंधी सध्या अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

सेपरेशन मॅरिज

सेपरेशन मॅरेज ही अशी व्यवस्था आहे, ज्यामध्ये विवाहित जोडपे एकत्र राहूनही वेगळे राहतात. कोणत्याही संघर्षाची वाट न पाहता तो असा निर्णय घेत आहे. याला सहमती देणारे जोडपे एकाच शहरात किंवा वेगवेगळ्या शहरात वेगळ्या ठिकाणी राहू लागतात.

सुख-दु:ख शेअर करण्यासोबतच ते एकमेकांचा खर्चही शेअर करतात. सेपरेशन मॅरेजमध्ये, जोडपे ठराविक कालावधीनंतर भेटतात आणि काही दिवस एकत्र राहतात. या दरम्यान, सामान्य पती-पत्नीमध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टींवर चर्चा केली जाते.

भविष्यातील बचत, विमा पॉलिसी, घरातील मोलकरणींच्या काळजीपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक विषयावर चर्चा केली जाते. पण हे सर्व फक्त वीकेंडलाच घडते, इमर्जन्सी असेल तेव्हाच जोडपे भेटतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT