Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

Gomantak Engineering Excellence Awards: जीवन गौरव पुरस्कारासाठी राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याचे माजी मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांची एकमताने निवड केली आहे.
Sandip Nadkarni lifetime achievement
Sandip Nadkarni GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘दै. गोमन्तक’च्या अभियांत्रिकी उत्कृष्टता पुरस्कारांसाठी नेमलेल्या ज्युरी समितीने यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याचे माजी मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांची एकमताने निवड केली आहे.

पणजीत ‘अभियंता दिना’चे निमित्त साधून १५ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, यानिमित्ताने राज्यातील सर्वोत्कृष्ट सेवा व अभिनव - कल्पक कामगिरी बजावलेल्या एकूण १० अभियंत्यांचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

संदीप नाडकर्णी यांनी सिव्‍हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली. मुख्य अभियंता, अतिरिक्त सचिवपदे त्यांनी भूषविली.

पायाभूत सुविधा निर्माण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सरकारात महत्त्वाची पदे भूषवितानाही म्हादई नदीच्या प्रश्नात त्यांनी रोखठोक भूमिका बजावली होती. ‘भूगर्भातील जलस्रोत’ व ‘गोव्यातील खाजन जमिनी’ ही त्यांची दोन गाजलेली पुस्तके त्यांचा या विषयावरील अभ्यास व गोव्याप्रतीची निष्ठा प्रतीत करतात.

संदीप ऊर्फ सुब्राय नाडकर्णी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९८१ साली उत्तीर्ण झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाचा व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमही पूर्ण केला. शिवाय जलशक्ती विषयावर रूरकी (उत्तराखंड) आयआयटीमधून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले होते. २०११ साली त्यांनी एमबीए पदवी प्राप्त केली.

Sandip Nadkarni lifetime achievement
Gomantak Coffee Club: गोमन्तकच्या कॉफी क्लबमध्ये 'पुरुष' नाटकातील कलाकारांशी खास संवाद...

त्यांनी गोव्याच्या पीडब्ल्यूडी, जलस्रोत खाते, तिळारी विकास महामंडळामध्ये कार्य केले असून जानेवारी २००६ मध्ये जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यांना यापूर्वी १९९३ मध्ये ‘राष्ट्रीय युवा अभियंता’ पुरस्कार प्राप्त झाला होता.

Sandip Nadkarni lifetime achievement
Gomantak Goud Maratha Samaj: गोमंतक गौड मराठा समाज संघटनेवर अजय गावडे यांची प्रशासक म्हणून निवड

जीवन गौरव पुरस्कारासह अभियांत्रिकी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, संशोधन, ऊर्जा, समाजासाठी प्रेरक कार्य, कृषी, सांस्कृतिक वारसा, ई-कचरा पुनर्वापर, कल्पकता व शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील ज्येष्ठ अभियंते उपस्थित राहणार असून गेल्या वर्षीप्रमाणेच तो रंगारंग असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com