Japan PM Attacked: जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्यावर बॉम्ब हल्ला... पाहा व्हिडिओ

जपानचे पंतप्रधान किशिदा भाषण करत असताना त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Japanese Prime Minister Fumio Kishida:
Japanese Prime Minister Fumio Kishida: Dainik Gomantak
Published on
Updated on

Japanese Prime Minister Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान किशिदा (Fumio Kishida) भाषण करत असताना त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत कीशिदा हे थोडक्यात बचावले आहेत. भर सभेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

या संदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार फुमिओ कीशिदा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कीशिदा हे एका सभेत भाषण करता असतांना हा हल्ला करण्यात आला. जपानच्या सार्वजनिक प्रसारक एनएचके ने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी मोठा स्फोट झाला. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी तातडीने कीशिदा यांना घेराव घालत त्यांना सुरक्षित ठिकाणी रवाना केले. तसेच आरोपी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

जीजीने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी कोण आहे हे अद्याप कळले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कीशिदा यांच्यावर समोक बॉम्ब फेकण्यात आला. पोलिस हल्लेखोराची चौकशी करत आहेत. कीशिदा हे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या एका उमेदवाराच्या समर्थनार्थ भाषण देत होते. यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com