goa breaking news marathi
goa breaking news marathiDainik Gomantak

Goa Live Updates: वास्कोतील बेपत्ता मुलगा सापडला प्रयागराजमध्ये

Goa Marathi Latest News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण,क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Vasco: वास्कोतील बेपत्ता मुलगा सापडला प्रयागराजमध्ये

ट्यूशनला जातो म्हणून ८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता घराबाहेर पडलेला चौदा वर्षीय मुलगा प्रयागराज येथे त्याच्या नातेवाईकाकडे पोहोचला. त्या मुलाला वास्कोला आणण्यासाठी त्याचे नातेवाईक प्रयागराजला जाणार आहेत. तो बेपत्ता झाल्यासंबंधी त्याच्या वडिलांनी मुरगाव पोलिस स्थानकात तक्रार केली होती. पोलिसांनी ही तक्रार अपहरण म्हणून नोंद केली होती.

Verna Accident: वेर्ण्यात कॉंक्रिट मिक्सरची धडक; एकजण ठार

वेर्णा येथील कोकण रेल्वे यार्ड परिसरात काँक्रिट मिक्सरची धडक बसल्याने सुदाम गायकवाड(५३)हा मरण पावला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी मिक्सर चालक सुभान आलम विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सदर घटना ११ रोजी दुपारी १२.३० वा. घडली. मूळचा बिहारचा सुभान आलम हा मिक्सर चालवत होता.

Goa Pollution: प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

औद्योगिक व किनारी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी तसेच महापालिका व पंचायतींच्या कचरा व्यवस्थापन सुविधांची पडताळणी करण्यासाठी विस्तृत तपासणी मोहिमेचे नियोजन गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com