ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Crime News: अतिदक्षता विभागात परदेशी महिलेवर उपचार सुरु होते. दरम्यान, प्रशिक्षणार्थी डॉ. वृषभने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
Solapur trainee doctor arrested by Goa Police
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उपाचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर प्रशिक्षणार्थी डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर वृषभ दोशी (मूळ. सोलापूर) याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी जुने गोवे येथील हेल्थ वे रुग्णालयात ही घटना घडली.

याप्रकरणी पीडितीच्या बहिणीने जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित डॉक्टरला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरोक्कोची महिला उपचारासाठी जुने गोवे येथील हेल्थ- वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, प्रशिक्षणार्थी डॉ. वृषभने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Solapur trainee doctor arrested by Goa Police
Karnataka Accident: कर्नाटकात गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 9 जणांचा चिरडून मृत्यू, 20 जखमी

संशयित वृषभ प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून त्याने महिलेच्या असाहाय्य आणि गंभीर स्थितीचा गैरफायदा घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर वृषभ गोव्यातून फरार झाला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता त्याला सांगलीतून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भारतीय न्यया संहिता कलम ६३ (२) (ई) आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने डॉ. वृषभ दोषीला निलंबित केले आहे. तसेच, पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडितेच्या उपचारासाठी तसेच, तक्रारीसंबधित लागणारी आवश्यक सर्व सहकार्य करणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com