इम्रान खान यांनी परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध कमी होण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेसोबत संबंध चांगले झाले तर ठिक, अन्यथा पाकिस्तानकडे 'चीनी' पर्याय खुले

अमेरिका (America) पाकिस्तानला महत्त्व देत नाही. याचे दुसरे कारण, त्याने चीनशी चांगले संबंध (Good relations with China) विचारात घेतले आहेत. चीनशी त्यांचे संबंध खूप जुने आणि खूप मजबूत आहेत. असे स्पष्ट मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडले आहे. (Pakistan's Prime Minister Imran Khan)

दैनिक गोमन्तक

आम्ही आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांच्या कॉलची वाट पाहत नाहीत. ते फोन करणार की नाही हे माहिती नाही. हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडून कोणत्याही कॉलची वाट पाहत नाही. असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan's Prime Minister Imran Khan) यांनी स्पष्ट केले आहे.

परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध कमी होण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. तसेच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले आहे. या मुलाखतीतही त्यांनी भारताकडे बोट दाखविले आहे.

इम्रान खान म्हणाले, अमेरिकेबरोबरचे संबंध घसरण्याची दोन प्रमुख कारणे दिली. ते म्हणाले की, अमेरिका भारताला आपला सामरिक भागीदार मानते, त्यामुळे आता अमेरिका पाकिस्तानला महत्त्व देत नाही. याचे दुसरे कारण, आमचे चीनशी चांगले संबंध आहेत. चीनशी आमचे संबंध खूप जुने आणि खूप मजबूत आहेत. म्हणूनच पाकिस्तानला बाजूला ठेवले जात आहे.

पाकिस्तान प्रत्येक वेळी असे म्हणत आहे की, अध्यक्ष बायडेन यांनी पाकिस्तानशी न बोलण्यामागे तांत्रिक किंवा इतर कारण असावे. पण, या गोष्टी पाकिस्तानच्या लोकांना मान्य नाहीत. ते त्यावर विश्वास ठेवायलाही तयार नाही. जर अमेरिकेची पाकिस्तानशी फोनवर चर्चा झाली आणि दोघांमधील सुरक्षा संबंध सुरळीत झाले तर ठिक आहे. अन्यथा पाकिस्तानकडे इतर पर्यायही आहेत. त्याचा विचार आम्ही करू शकतो आणि त्यांच्यासोबत जाऊ शकतो.

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर बोलताना इम्रान खान म्हणाले की, अमेरिकन सैन्य तालिबानसाठी दोन दशके काहीही करू शकले नाही. ते आता मध्येच अफगाणिस्तान सोडत आहेत, ज्यामुळे परिस्थिती बिकट होत आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानला एक महत्त्वाचा देश आहे. ते म्हणाले की हे खूप सामान्य आहे की जर तुम्हाला अफगाणिस्तानवर राजकीय तोडगा काढायचा असेल तर तुम्हाला बलाढ्य लोकांशी बोलावे लागेल. पण, अमेरिका आता अफगाणिस्तानच्या दुर्दशेसाठी पाकिस्तानला दोष देत आहे, जे चुकीचे आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल आम्ही देखील चिंतित आहोत असे त्यांनी सांगितले. याचे कारण तेथे सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे हेच आहे. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे. त्यांच्या मते, तालिबानमध्ये बहुतेक मख्तून आहेत. जे पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या पख्तुननांवर प्रभाव टाकतात. 2003 आणि 2004 मध्येही पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या पख्तुनांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. यामध्ये पाकिस्तानचे सुमारे 70 हजार लोकही मारले गेले कारण आम्ही अमेरिकेला पाठिंबा देत होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT