Home Dainik Gomantak
ग्लोबल

टरबूज अन् लसूण द्या अन् घर घ्या; या देशाला घेरलं आर्थिक मंदीनं

घर खरेदी करण्यासाठी लोक आयुष्यभराची पूंजी गुंतवतात.

दैनिक गोमन्तक

घर खरेदी करण्यासाठी लोक आयुष्यभराची पूंजी गुंतवतात. परंतु टरबूज आणि लसूणच्या बदल्यात या देशात घर दिलं जात आहे. हे ऐकून तुम्ही चकित झाला असाल ना! चीनमध्ये सध्या हे घडत आहे. याचे कारण म्हणजे चीनमध्ये मोठी आर्थिक मंदी आली आहे. ज्याचा परिणाम तेथील प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रावर होताना दिसत आहे. चीनमधील रिअल इस्टेट व्यवसायावर मंदीचा भयंकर परिणाम झाला आहे. या क्षेत्रामध्ये आता प्रॉपर्टी डीलर्सही असेच काही करत आहेत. (Watermelons As Payment In Value Of Property In China Developers Accepting)

वास्तविक, मंदीचा परिणाम चीनमध्ये (China) दिसून येत आहे. त्यामुळे चिनी रिअल इस्टेट डेव्हलपर्स पेमेंटऐवजी टरबूज घेत आहेत. याशिवाय इतर कृषी उत्पादनेही पेमेंट म्हणून स्वीकारली जात आहेत. चीनच्या टियर 3 आणि 4 शहरांमधील रिअल इस्टेट (Real Estate) डेव्हलपर्संनी अलीकडेच विविध प्रचार मोहिमा सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये घर खरेदीदारांना त्यांच्या डाउन पेमेंटचा काही भाग गहू आणि लसूणसह भरण्याची परवानगी दिली आहे.

FPI या वृत्तसंस्थेनुसार, चीनमधील घरांच्या विक्रीचा आलेख सलग 11 महिन्यांपासून घसरला आहे. गेल्या वर्षीच्या मे 2021 च्या मे महिन्याच्या आकडेवारीची तुलना केल्यास 31.5 टक्के घट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनमधील गृहबाजारात सातत्याने घसरण होत आहे. अर्थव्यवस्थेतील मंदी, आर्थिक संकट आणि प्रकल्पावर बांधकाम सुरु होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था करण्यासारखे निर्णय ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत.

दरम्यान, पूर्वेकडील नानजिंग शहरातील एका रिअल इस्टेट डेव्हलपरने सांगितले की, 'आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून 100,000 युआन पर्यंत किमतीचे टरबूज होम डाउन पेमेंट म्हणून स्वीकारत आहोत.' याशिवाय, गृहनिर्माण कंपनी सेंट्रल चायना मॅनेजमेंटने मे महिन्याच्या शेवटी सोशल मीडियावर एक जाहिरात जारी केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, लसणाच्या नव्या हंगामाच्या निमित्ताने, कंपनी शेतकर्‍यांसाठी (Farmer) क्यूईमध्ये घरे खरेदी करण्यासाठी मोठ्या ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत, शेतकरी घराच्या किमतीएवढे लसूण देऊन त्यांचं हक्काचं घरं बुक करु शकतात.'

दुसर्‍या अहवालानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्व प्रमोशनल पोस्टर्स काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. आता आम्हाला प्रचारासाठी इतर मोहिमा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT