Afghanistan: तालिबान्यांचा नवा फर्मान, टिकटॉक अन् PUBG वर घातली बंदी

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान सरकारने व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉक आणि PUBG वर बंदी घातली आहे.
TickTock
TickTockDainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉक आणि PUBG वर बंदी घातली आहे. या अ‍ॅप्समुळे अफगाणिस्तानातील तरुणांची दिशाभूल होत असल्याचे सांगत तालिबान सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही अ‍ॅप अफगाण लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने (Taliban) सत्ता हाती घेताच अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) संगीत, चित्रपट आणि टीव्ही मालिकांवर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत अफगाण नागरिकांकडे मनोरंजनाचे टिकटॉक (TickTock) आणि PUBG हे एकमेव साधन उरले होते, त्यावरही तालिबानने आता बंदी घातली.

TickTock
Afghanistan: काबूलसह 3 शहरांत बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी

दरम्यान, तालिबान मंत्रिमंडळाने एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, 'या अ‍ॅप्सनी तरुण पिढीची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.' त्यात पुढे असेही म्हटले आहे की, दूरसंचार मंत्रालयाने हे दोन्ही अ‍ॅप बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. टीव्ही चॅनेल्संना आक्षेपार्ह कार्यक्रम दाखवण्यापासून रोखण्याचे निर्देशही त्यांनी मंत्रालयाला दिले आहेत. मात्र, बातम्या आणि धार्मिक आशयाच्या पलीकडे अशा फार कमी गोष्टी प्रसारित केल्या जात आहेत. तालिबानने सत्तेत आल्यानंतर समसायिक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हळूहळू तालिबान्यांनी समाजजीवनावर अंकुश ठेवायला सुरुवात केली आहे. विशेषत: महिलांच्या हक्कांवर गदा येत आहे.

TickTock
Blast in Afghanistan: हेरात शहरात भीषण बॉम्बस्फोट; 12 ठार, 25 जण जखमी

महिलांवर पुन्हा निर्बंध लादले

अफगाणिस्तानातील मुलींच्या शाळा बंद करण्याचे आदेश तालिबान सरकारने दिले आहेत. त्याचबरोबर महिलांना सरकारी नोकऱ्यांमधून काढून टाकण्यात आले आहे. तसेच परदेशात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. महिलांना देशातही प्रवास करण्याची परवानगी देखील देण्यात आलेली नाही. महिलांना (Women) प्रवास करायचा झाल्यास घरातील एकादा सदस्य सोबत असणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वीच्या अफगाणिस्तान सरकारने देखील PUBG वर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. डेटारिपोर्टल या स्वतंत्र डेटा संग्राहकाने जानेवारीमध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 38 दशलक्ष लोकांचा देश असलेल्या अफगाणिस्तानमध्ये फक्त 9 दशलक्ष लोक इंटरनेट वापरतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com