Twitter Accounts Banned: ट्विटरने भारतातील हजारो ट्वीटर अकाउंटवर बंदी घातली आहे. ट्विटरने मासिक अनुपालन अहवालात यासंबंधीची माहिती दिली आहे. निवेदनानुसार, मे 2022 मध्ये 46,000 हून अधिक भारतीय ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. (Over 46000 Indian Twitter Accounts Banned Know What You Should Avoid Posting)
अहवालानुसार, ट्विटरने (Twitter) आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे ही अकाउंट बंद केली आहेत. या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, ट्विटरने लहान मुलांचे लैंगिक शोषण, तत्सम सामग्रीचा अप्रचार रोखण्यासाठी सुमारे 43,656 अकाउंटवर बंदी घातली आहे. तर उर्वरित 2,870 भारतीय यूजर्सच्या ट्विटर अकाउंटवरुन दहशतवादाला (Terrorism) प्रोत्साहन दिल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, तुमच्यावर अशीच बंदी घातली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी, अशी कोणतीही सामग्री कधीही पोस्ट करु नका.
ट्विटरने आपल्या अहवालात म्हटले आहे की, "आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकाचे स्वागत करतो. परंतु धमक्या देणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही."
तक्रारींमुळे भारतात ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे
ट्विटरने म्हटले आहे की, 26 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत ट्विटरच्या स्थानिक तक्रार यंत्रणेद्वारे भारतात सुमारे 1,698 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑनलाइन गैरवर्तन किंवा छळ, द्वेषपूर्ण प्रचार, चुकीची माहितीचा प्रचार-प्रसार, तोतयागिरी, ऑनलाइन छळवणुकीशी संबंधित नियमांचे उल्लंघन, ही कारणे Twitter ने आकाऊंट बंद करण्यासंबंधी सांगितली. इंडिया ग्रीव्हन्स चॅनेलद्वारे प्राप्त झालेल्या प्रत्येक यूजर्सच्या तक्रारीचे मूल्यमापन Twitter च्या सेवा अटी आणि नियमांनुसार सूचित करण्यात आले आहे की, कोणतीही सामग्री मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे का हे तपासून पाहिले जाईल.
दुसरीकडे, केवळ ट्विटरच नाही तर, मे महिन्यात, Google ने देखील बाल लैंगिक शोषण आणि हिंसक अतिरेकी सामग्रीसह हानिकारक सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी 393,303 अकाउंट बंद केली. काही दिवसांपूर्वी, तुमच्या दैनिक इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने मे महिन्यात 19 लाखांहून अधिक भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.