Russia Ukraine War
Russia Ukraine War dainikgomantak
ग्लोबल

Russia-Ukraine war : युक्रेनमधील युद्धात किमान 1,276 नागरिक ठार, 1,981 जखमी

दैनिक गोमन्तक

Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 38 व्या दिवस आहे. यायुद्धामुळे युक्रेनचे जनजीवन पुर्णपणे नष्ट झाले असून लाखो नागरिकांनी इतर देशात आश्रय घेतला आहे. तर 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 1,276 युक्रेनियन मारले गेले असून 160 मुलांसह 1,981 जण जखमी झाले आहेत. गोळीबार आणि हवाई हल्ल्यात सर्वाधिक बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या उच्चायुक्तांनी (UN High Commissioner on Human Rights) सांगितले आहे. (War in Ukraine kills at least 1,276 civilians, 1,981 wounded)

तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या (Human Rights) उच्चायुक्तांनी 24 फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले. तेव्हापासून 31 मार्च 2022 पर्यंत 3,257 नागरिक (एक दिवस आधीच्या अहवालात 3,167) 1,276 मारले गेल्याचे तर (1,232) नागरीकांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर OHCHR चे असे मत आहे की, वास्तविक आकडे खूपच जास्त आहेत. कारण काही ठिकाणांवरील माहिती प्राप्त होण्यास उशीर झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही युद्ध सुरू असून तेथील माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे तेथील अनेक अहवाल हे पुष्टीकरणासाठी प्रलंबित आहेत.

तर मारियुपोल आणि वोल्नोवाखा (डोनेस्तक प्रदेश), इझियम (खार्किव प्रदेश), पोपस्ना (लुहान्स्क प्रदेश), आणि इरपिन (कीव प्रदेश) येथे झालेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे प्राण गेले असावेत अशी शंका ही उच्चायुक्तांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येथील कोणत्याही आकडेवारीची पुष्टी झालेली नाही. त्यामुळे त्याचा वरील आकडेवारीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही.

उच्चायुक्तांनी असेही सांगितले आहे की, बहुतांश नागरीकांचे बळी स्फोटक शस्त्रांच्या वापरामुळे झाले आहेत. ज्यात अटलरी (artillery), रॉकेट, क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांचा (air strikes) समावेश आहे. तर या युद्धात रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 260 पुरुष, 184 महिला, काही 36 मुले आणि 18 मुली ठार झाल्या आहेत. तर 61 मुले आणि 717 प्रौढ यांची ओळख पटवने अजून बाकी आहे की ते पुरूष होते की स्त्री. इतकेच काय तर 1,981 जखमींमध्ये 38 मुली आणि 34 मुले आहेत मात्र अजूनही 88 असे बालके (Children) आहेत ज्यांची ओळख पटलेली नाही. दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, आणखी तीन मुले मारली गेली आणि 11 इतर जखमी झाल्याचे समोर येत आहे.

OHCHR ने सांगितले की, डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशात, 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत, सरकार-नियंत्रित प्रदेशात 358 (338) ठार आणि 772 (743) जखमी झाले होते. युक्रेनच्या (Ukraine) इतर प्रदेशात (कीव शहर, आणि चेरकासी, चेर्निहाइव्ह, खार्किव (Kharkiv), खेरसन, कीव, मायकोलायव्ह, ओडेसा, सुमी, झापोरिझिया, निप्रॉपेट्रोव्हस्क आणि झिटोमिर प्रदेश), जे सरकारी नियंत्रणाखाली होते. तेंव्हा 1,814 लोक मारले गेले आणि (8514) 963 जखमी झाले होते. तर 1 एप्रिल रोजी 08:00 पर्यंत, 153 (148) मुले मारली गेली आणि 245 (232) जखमी झाल्याचे युक्रेनच्या अभियोजक जनरलच्या कार्यालयानुसार माहिती स्पष्ट होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : भाजपमधील मोहरे धोक्यात; लोकसभा निवडणूक निकालानंतर ठरणार नेते-पदाधिकाऱ्यांंचे राजकीय भवितव्य

Panaji News : गोवा घडविण्याची प्रक्रिया अजूनही कायम : राजू नायक

Panaji News : चुकीच्या मानसिकतेचा फेणीला फटका; बारचालकांनी प्रचार, प्रसार करणे गरजेचे

Crime News : गरोदर महिलेला मारहाण, पोलिस स्थानकावर धडक; सखोल चौकशी करण्याची महिलांची मागणी

Goa Rain : कडाक्याच्या उष्म्यावर अवकाळी सरींचा गारवा; १५ मे पर्यंत पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT