जागतिक संशोधनातून समोर आला त्वचेच्या कॅन्सरचा धोका; पहा कशी घ्याल काळजी

2040 पर्यंत सर्वात धोकादायक त्वचेच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. त्याच वेळी, जगातील 68% अधिक लोक यापासून त्यांचे प्राण वाचवू शकणार नाहीत.
Melanoma Skin Cancer
Melanoma Skin CancerDainik Gomantak

Melanoma Skin Cancer : जगातील बहुतेक देशांमध्ये, वय वर्ष 50 आधीच्या महिलांना आणि त्यानंतरच्या पुरुषांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. जागतिक संशोधनातून समोर आले आहे की, 2040 पर्यंत सर्वात धोकादायक त्वचेच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होईल. त्याच वेळी, जगातील 68% अधिक लोक यापासून त्यांचे प्राण वाचवू शकणार नाहीत. या कर्करोगाला मेलेनोमा (Melanoma Cancer) म्हणतात. त्वचेच्या कर्करोगाच्या प्रत्येक 5 पैकी 1 रुग्ण मेलेनोमाचा असतो. (Global research shows risk of skin cancer; See how to take care)

जामा डर्माटोलॉजी मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार (Research), ऑस्ट्रेलियातील नवीन रुग्णांची संख्या अनेक आफ्रिकन आणि आशियाई देशांपेक्षा 36 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक लोक मारले गेले.

जागतिक संशोधनानुसार...

कर्करोगावरील (Cancer) संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये मेलेनोमाचे 3,25,000 नवीन रुग्ण आढळले, तर 57,000 मृत्यू झाले आहेत. हा आजार टाळण्यासाठी, आपण शरीराला सूर्याच्या थेट संपर्कात येऊ देऊ नये. आणि त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी, यासाठी चांगल्या सनस्क्रीनचा वापर करावा.

मेलेनोमा हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. हा आजार सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होतो. या स्थितीत त्वचेवर काळ्या तिळासारखे डाग पडू लागतात. हळूहळू त्याचा आकार वाढू लागतो. हा देखील एक प्रकारचा अनुवांशिक रोग आहे, जो पिढ्यानपिढ्या चालू राहतो. यामध्ये काळजी घेतल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com