Israel PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ''युद्ध आता महागात पडू लागले'' ; गाझामध्ये मारले जातायेत इस्रायली सैनिक

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरुच आहे. इस्रायलने 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा केली.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरुच आहे. इस्रायलने 7 ऑक्टोबरला हमासच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा केली. आपल्या हल्ल्यादरम्यान हमासने 1400 लोक मारले आणि सुमारे 200 लोकांचे अपहरण केले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हमासच्या ताब्यातील गाझामध्ये हवाई हल्ले सुरु केले. इस्रायलने हमासला समूळ नष्ट करण्यासाठी गाझामध्ये आपले सैन्य पाठवले. दरम्यान आता, दोन्ही बाजूंच्या जमिनीवरील संघर्षात इस्रायलचेही मोठे नुकसान होत आहे. इस्त्रायली सैनिकही सातत्याने मारले जात आहेत. सैनिकांच्या मृत्यूमुळे दुखावलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, ''गाझामधील युद्ध आता महागात पडू लागले आहे.''

इस्रायली सैनिकांची सातत्याने हत्या होत आहे

अरब न्यूजच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितले की, हमाससोबतच्या लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या वाढत असल्याने गाझामधील युद्धाची खूप मोठी किंमत मोजावी लागत आहे. इस्त्रायली लष्कराने शुक्रवारी पॅलेस्टिनी भागात 14 सैनिकांना ठार मारल्याची घोषणा केली. "युद्धाची खूप मोठी किंमत मोजावी लागत आहे... परंतु आमच्याकडे लढत राहण्याशिवाय पर्याय नाही," असे नेतन्याहू म्हणाले. "आम्ही आमची सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत सर्व शक्तीनिशी लढत राहू," असेही ते पुढे म्हणाले.

नेतन्याहू पुढे म्हणाले की, "हे एक दीर्घ युद्ध असेल... हमासचा खात्मा होईपर्यंत हे युद्ध सुरुच राहील." इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनी प्रदेशात 27 ऑक्टोबरपासून जमिनी कारवाई सुरु केल्यापासून 153 सैनिक गमावले आहेत, ज्यात शनिवारी ठार झालेल्यांमध्ये 10 जणांचा समावेश होता. गाझामधील युद्धाव्यतिरिक्त इस्रायलला लेबनॉनच्या उत्तर सीमेवर हिजबुल्लाह दहशतवाद्यांचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या युद्धबंदी अंतर्गत हमासने 80 इस्रायली बंधकांसह 105 ओलिसांची सुटका केली होती, त्या बदल्यात इस्रायलने देखील 240 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली होती. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, 137 ओलीस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या कतारने इशारा दिला की, इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत राहिल्यास नव्या युद्धविरामातर्गंत ओलिसांची सुटका करण्यात अडथळा येऊ शकतो. कतारचे म्हणणे आहे की, या हल्ल्यांमुळे दोन्ही पक्षांकडून चर्चेची दारे बंद होत आहेत. तर हमासचे म्हणणे आहे की, ते इस्रायली सैन्याशी लढत राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POP Idol Ban: 'पीओपी' मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई! गेल्या वर्षी 27 गुन्हे; 20 टक्क्यांहून अधिक 'पीओपी'वर बंदी

खरी कुजबुज: पालेकरांचा ‘आघाडी’ला हात की खोडा?

Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

Mhadei Water Dispute: 'म्‍हादई' नदीची ताबडतोब पाहणी करा, सरकारची 'म्‍हादई प्रवाह'कडे मागणी; 'इंटरलोक्युटरी' अर्ज सादर करणार

Dasun Shanaka Century: 12 उत्तुंग षटकार, 4 खणखणीत चौकार... दासुन शनाकाचा 'रुद्र अवतार'! 39 चेंडूत ठोकलं शतक VIDEO

SCROLL FOR NEXT