Wagner's Army Dainik Gomantak
ग्लोबल

Wagner's Army Revolts Against Putin: "आमचे 25 हजार सैनिक बलिदानासाठी तयार"! पुतिन यांना आव्हान; पाहा, रशियातील रस्त्यावरील थरारक दृश्य

Wagner Army: वॅगनर ग्रुप आणि रशियन सैन्य यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रशियाशी संबंधित असलेल्या एका खासगी सैन्य गटाचा नेता येवगेनी प्रिगोझिन याने मॉस्कोला शिक्षा करून बदला घेण्याची शपथ घेतली आहे.

Ashutosh Masgaunde

Wagner Army In Russia :

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सर्वात मोठ्या संकटात सापडले आहेत. रशियात सत्तापालट होण्याची भीती आहे. वॅगनरच्या सैन्याने पुतिन यांच्यासमोर आव्हान निर्माण करत, रोस्तोवमधील दक्षिणी लष्करी जिल्हा इमारतीचा ताबा घेतला आहे

यासह, क्रेमलिनच्या सुरक्षेसाठी मॉस्कोमध्ये रणगाडे तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. TASS या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, शनिवारी पहाटे मध्य मॉस्कोमध्ये लष्करी वाहने दिसली.

पुतीन यांच्या खाजगी मिलिशिया वॅगनर ग्रुपने बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. वॅगनर ग्रुप आणि रशियन सैन्य यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रशियाशी संबंधित असलेल्या वॅगनर ग्रुपचा बॉस येवगेनी प्रिगोझिन याने रशियाचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना वॅगनर बॉस येवगेनी प्रीगोझिन यांनी केलेल्या सशस्त्र उठावाच्या प्रयत्नाबद्दल नियमितपणे माहिती दिली जात आहे. रशियाने म्हटले आहे की पुतिन यांना संरक्षण मंत्रालय, अंतर्गत व्यवहार मंत्रालय आणि नॅशनल गार्डकडून या प्रकरणाची माहिती सतत मिळत आहे.

वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी युक्रेनमधील बाखमुत येथील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे.

या हल्ल्यात वॅगनरचे अनेक सैनिक मारले गेले. प्रीगोझिनने शपथ घेतली, "आम्ही मॉस्कोला जात आहोत आणि जो कोणी आमच्या केंद्रात प्रवेश करेल त्याला जबाबदार धरले जाईल."

वॅगनर ग्रुपच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ संदेशांच्या मालिकेत, प्रीगोझिन म्हणाले, "त्यांनी (रशियाच्या सैन्याने) आमच्या शिबिरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात आमचे सैनिक मोठ्या संख्येने, आमचे सहकारी मारले गेले.

ते म्हणाले, 'पीएमसी वॅग्नरच्या कमांडर्स कौन्सिलने निर्णय घेतला आहे, की देशाच्या लष्करी नेतृत्वाने आणलेल्या वाईट गोष्टी थांबवायला हव्यात. आपल्याला ही समस्या संपवायची आहे. हा लष्करी उठाव नसून न्यायाचा मोर्चा आहे.

आमचे 25 हजार सैनिक मरायला तयार: वॅगनर ग्रुप

वॅगनर ग्रुपच्या प्रमुखाने सांगितले की, त्यांच्या सैन्याने दक्षिणेकडील सीमा भागात प्रवेश केला होता, वॅगनरच्या सैन्याने रोस्तोवमधील दक्षिणी लष्करी जिल्हा इमारतीचा ताबा घेतला आहे. आपले 25,000 मजबूत सैन्य "मरायला तयार" असल्याचेही त्यांनी युद्ध घोषित करण्याच्या शैलीत सांगितले.

या सर्व घडामोडींनंतर रोस्तोवमधील रशियन अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, लिपेटस्कचे गव्हर्नर म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सुरक्षा दक्षता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठरवले आहे.

ड्यूमाची वाढीव दक्षता

येवगेनी प्रीगोझिन यांनी वॅगनर ग्रुपच्या या प्रयत्नाला न्यायासाठीचा लढा म्हटले आहे. हे समोर आले आहे की वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांनी नोव्होचेरकास्ककडे जाताना पहिली चौकी आधीच पार केली आहे.

रशियन सैन्याचे मुख्यालय नोवोचेरकास्क येथे आहे. मॉस्कोच्या रस्त्यावर लष्करी वाहनांची संख्या बरीच वाढली आहे. रशियन स्पेशल फोर्सने मॉस्कोभोवती नाकाबंदी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन लष्करी अधिकारी क्रेमलिन आणि ड्यूमा, रशियाची संसद सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नागरिकांनी येवगेनीला पाठिंबा द्यावा: विरोधी नेते मिखाईल खोडोरकोव्स्की

पुतीन विरोधी नेते मिखाईल खोडोरकोव्स्की यांनी रशियन लोकांना वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

येवगानी यांनी रशियाचे लष्करी नेतृत्व नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी (वॅगनर) क्रेमलिन काबीज करण्याचा निर्णय घेतला असेल, तर सैतानाला मारण्याइतपत पाठिंबा द्या, असे आवाहन करून ते म्हणाले की, हे खूप महत्त्वाचे आहे.

मॉस्कोचे महापौर म्हणतात की सुरक्षा मजबूत करण्यासाठी दहशतवादविरोधी उपाययोजना केल्या जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंधित केले जाऊ शकते. व्होरोनेझ आणि लिपेटस्क प्रदेशातील FSB (फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस) कार्यालये रिकामी केली जात आहेत. ते रोस्तोव्हहून मॉस्कोला जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT