Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin: पुतिन यांचा यू-टर्न! ''इस्लामिक कट्टरपंथी रशियावर हल्ला करुच शकत नाहीत''

Islamic Fundamentalists Cannot Attack Russia: क्रोकस सिटी हॉल हत्याकांडाबद्दल पुतिन यांनी म्हटले की, देशाच्या अखंडतेला धक्का पोहोचवण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणण्यात आले.

Manish Jadhav

Vladimir Putin: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी मॉस्कोमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांना मोठा हल्ला घडवून रशियाला मोठा धक्का दिला. यातच आता, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यू-टर्न घेतला आहे. क्रोकस सिटी हॉल हत्याकांडाबद्दल पुतिन यांनी म्हटले की, देशाच्या अखंडतेला धक्का पोहोचवण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणण्यात आले. याशिवाय, या हल्ल्यामागे अन्य कोणताही हेतू दिसत नाही. काहीही झाले तरी इस्लामिक कट्टरपंथी कधीही रशियाला लक्ष्य करु शकत नाहीत, असेही पुतीन म्हणाले.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी रशियन ट्रेड युनियन फेडरेशनच्या परिषदेत बोलत होते. रशिया हे धार्मिक सौहार्द आणि एकतेचे अद्वितीय उदाहरण असल्याचे सांगून पुतिन म्हणाले की, ''रशिया केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही इस्लामिक मूल्यांचा स्वीकार करतो. अशा परिस्थितीत रशिया इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य बनू शकत नाही हे स्पष्ट आहे.''

पुतिन म्हणाले होते की, कट्टरपंथीयांनी हल्ला केला

दरम्यान, पुतिन यांनी 10 दिवसांपूर्वी मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये ज्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली ते कट्टर इस्लामी असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे, कीवने हा हल्ला आपण केला नसल्याचे सांगितले. मात्र या हल्ल्यात युक्रेनची सर्वात मोठी भूमिका असू शकते, असेही पुतीन म्हणाले होते. पुतिन यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर पुतिन यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत हा हल्ला इस्लामी कट्टरवाद्यांनी केल्याचे म्हटले होते. मात्र आता, त्यांनी स्वत:च्या वक्तव्यापासून यू-टर्न घेतला आहे.

दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी रशियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले होते. रशियन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनने सांगितले होते की, हल्लेखोरांनी क्रोकस सिटी हॉलवर हल्ला केल्यानंतर काही मिनिटांत पुतिन यांना याची माहिती देण्यात आली. हॉल हे मॉस्कोच्या पश्चिमेकडील असलेले एक मोठे संगीत ठिकाण आहे, ज्यामध्ये 6,200 लोक बसू शकतात. प्रसिद्ध रशियन रॉक बँड पिकनिकच्या मैफिलीसाठी क्रोकस सिटी हॉलमध्ये लोकांची गर्दी जमली होती तेव्हा हा हल्ला झाला. अहवालात म्हटले आहे की, हल्लेखोरांनी स्फोटके फेकल्यानंतर आग लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT