Vladimir Putin Nuclear Bomb Threat: पुतिन यांच्या अणुबॉम्बच्या धमकीला घाबरला 'हा' नाटो देश; युक्रेनला पाठवणार नाही सैन्य

Vladimir Putin Nuclear Bomb Threat: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध धोकादायक वळण घेत आहे. या महायुद्धामुळे आतापर्यंत लाखो मारले गेले
Vladimir Putin
Vladimir PutinDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Vladimir Putin Nuclear Bomb Threat: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध धोकादायक वळण घेत आहे. या महायुद्धामुळे आतापर्यंत लाखो मारले गेले आहेत. अब्जावधींचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या युद्धादरम्यान लाखो लोकांवर पलायन करण्याची वेळ आली. या युद्धात नाटो आणि अमेरिकेच्या मदतीने युक्रेनचे सैन्य पुतिन यांच्या खतरनाक सेनेला धक्क्यावर धक्के देत आहे.

युक्रेनसोबतच्या युद्धात इतर देशांच्या हस्तक्षेपाबाबत पुतिन यांनी सातत्याने आपली भूमिका मांडली आहे. पुतिन यांनी अलीकडेच, नाटोने युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. पुतिन यांनी मोठा हल्ला करण्याची औपचारिक धमकी दिली होती. पुतीन यांच्या धमकीचा परिणाम असा झाला की, त्यांनी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची घोषणा मागे घेतली.

दरम्यान, इथे आपण नाटो देश पोलंडबद्दल बोलत आहोत. नाटो सदस्य पोलंडने युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याची आमची कोणतीही योजना नाही, असे पोलंडने एका नव्या निवेदनात म्हटले आहे. पुतिन यांच्या धमकीनंतर पोलंडने हे केल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे मत आहे. पोलंडने म्हटले की, ते युक्रेनियन सेवा सदस्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सैन्य पाठवणार नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांनी सैन्य पाठवल्यास अणुयुद्धाचा इशारा दिला होता.

Vladimir Putin
Vladimir Putin: पुतिन पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत, 2030 पर्यंत सत्तेत राहण्याची तयारी; तीन दशकांचा होणार कार्यकाळ

पाश्चात्य हस्तक्षेपावर पुतिन संतापले

पुतिन यांनी अलीकडेच पश्चिमेकडील देशांना अणुयुद्धाची धमकी दिली आहे. पाश्चात्य देश युक्रेनला मदत करत राहिल्यास आम्ही त्यांच्या सीमाक्षेत्रात ठेवलेल्या अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागे हटणार नाही, हे त्या देशांनी विसरु नये, असे पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Political Meetings During Ganesh Chaturthi
Donald Trump China Spying Claim
India Nuclear Weapons Report 2026
Donald Trump Warning Iran Nuclear Facility Attack
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com