Wladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin: 'नाटो अन् रशियामध्ये युद्ध झाले तर जग तिसऱ्या महायुद्धापासून...' पुतीन यांचा पश्चिमी राष्ट्रांना इशारा

Vladimir Putin: आता पुतीन पुन्हा एकदा मोठ्या संख्येच्या मतांनी निवडून आल्यानंतर युक्रेन तणावाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Vladimir Putin warns Nato countries 3rd world war

रशियाचे राष्ट्रपती वाल्दमिर पुतीन हे आपल्या वक्तव्यामुळे तसेच युक्रेनबरोबर सुरु असलेल्या युद्धामुळे सातत्याने चर्चेत असतात. आता मात्र सलग पाचव्यांदा राष्ट्रपतीपदावर शिक्कामोर्तब करत चर्चांचा भाग बनले आहेत. महत्वाचे म्हणजे, निवडणूकांमध्ये विजय मिळाल्यानंतर त्यांनी पश्चिमी राष्ट्रांना इशारा दिला आहे.

पुतिन म्हणाले की, रशिया आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्यामध्ये थेट संघर्षाचा अर्थ असा होईल की जग तिसऱ्या महायुद्धापासून फक्त एक पाऊल दूर असेल. मात्र, अशी परिस्थिती क्वचितच निर्माण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांनी अनेकदा अणुयुद्धाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे पण युक्रेन( Ukraine ) युद्धात अणुबॉम्बची गरज भासेल यावर त्यांचा विश्वास नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आता पुतीन पुन्हा एकदा मोठ्या संख्येच्या मतांनी निवडून आल्यानंतर युक्रेन तणावाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाई वाढली असून, जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे. रशिया ( Russia )ने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि अनेक युरोपिय देशांनी रशियाच्या व्यापारावर बंदी घातली होती. मात्र तरीही, रशियाने आपल्या तेलाच्या निर्यातीवरील किंमती कमी करत नफा कमावला आहे.

आता पुतीन पाचव्यांदा राष्ट्रपतीपदावर आल्यानंतर कोणते बदल करणार, रशियासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांबरोबर कशाप्रकारे संबंध प्रस्थापित करणार हे पाहणे महत्वाचे आहे. याबरोबरच, युक्रेनबरोबरच्या युद्धाला कधी स्थगिती मिळणारे याकडेदेखील संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT