Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

Russian Scientists Grow Human Organs: नुकतीच रशिया सरकारने मानवी पेशींचे वय वाढण्याची प्रक्रिया संथ करणारी 'जीन थेरपी' आणि औषधे विकसित करत असल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली.

Manish Jadhav

Vladimir Putin Anti Aging Mission: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सध्या 73 वर्षांचे आहेत, परंतु त्यांच्या फिटनेसमुळे त्यांच्या अँटी-एजिंगवर नेहमीच चर्चा होत असते. आता त्यांच्या वाढत्या वयाशी संबंधित एक धक्कादायक सत्य संपूर्ण जगासमोर आले. पुतिन यांना तब्बल 150 वर्षांपर्यंत जगण्याची तीव्र इच्छा आहे.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षी बीजिंगमधील लष्करी परेडदरम्यान पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान पुतिन यांनी, मानवाने ठरवले तर तो आपले अवयव बदलून अमरत्व प्राप्त करु शकतो, असे विधान केले होते. या दोघांमधील संभाषणाचा ऑडिओ-व्हिडिओ व्हायरल झाला होता, परंतु जगातील वैज्ञानिकांनी सुरुवातीला याकडे दोन ज्येष्ठ नेत्यांमधील एक अजब संवाद म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, नुकतीच रशिया सरकारने मानवी पेशींचे वय वाढण्याची प्रक्रिया संथ करणारी 'जीन थेरपी' आणि औषधे विकसित करत असल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली.

या स्वप्नपूर्तीसाठी रशियामध्ये एक अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली असून तिथे थेट मानवी अवयव विकसित केले जात आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘न्यू हेल्थ प्रिव्हेंशन टेक्नॉलॉजीज’ असे नाव देण्यात आले असून, यासाठी 26 अब्ज डॉलर्स (सुमारे 2500 अब्ज रुपये) खर्च केले जात आहेत. विशेष म्हणजे, पुतिन यांची कन्या मारिया वोरोन्त्सोवा देखील या प्रोजेक्टशी थेट जोडलेली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत खराब झालेले मानवी अवयव पुन्हा जिवंत करण्यासाठी 3डी बायोप्रिंटिंग प्रक्रियेचा वापर केला जात आहे.

रशियन शास्त्रज्ञांनी ह्युमन कार्टिलेज टिशू आणि उंदराच्या थायरॉईड ग्रंथीचे यशस्वी बायोप्रिंटिंग देखील केले. आता जीन-मॅच केलेल्या लहान डुकरांमध्ये मानवी अवयव वाढवून ते प्रत्यारोपित करण्याचे आणि त्याद्वारे मानवी आयुष्य वाढवण्याचे संशोधन सुरु आहे.

पुतिन यांच्या मते, जर मानवी अवयवांचे नियमित ट्रान्सप्लांटेशन केले गेले, तर माणूस कायम तरुण आणि कदाचित अमरही होऊ शकतो. यावर शी जिनपिंग यांनीही सहमती दर्शवत या शतकाच्या अखेरीस माणसाचे वय 150 वर्षांपर्यंत पोहोचू शकते, असे म्हटले होते. रशियात (Russia) पुरुषांचे सरासरी वय सध्या 68 वर्षे आहे, जे युरोपमधील सरासरी 78 वर्षांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास तो संपूर्ण रशियात लागू करण्याची योजना आहे, जेणेकरुन वृद्धत्वाशी संबंधित समस्यांवर मात करता येईल.

रशियाचे उप-विज्ञान मंत्री डेनिस सेकिरिन्स्की यांनीही रशियामध्ये वृद्धत्वाविरुद्धची लढाई सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या संपूर्ण मोहिमेचे मुख्य सूत्रधार मिखाइल कोवाल्चुक हे आहेत, जे कुरचातोव्ह इन्स्टिट्यूटचे प्रमुख आणि भौतिकशास्त्रज्ञ आहेत. रशियातील अँटी-एजिंग मोहिमेचा मुख्य चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विज्ञान लवकरच मानवाला स्वतःचे अवयव दुरुस्त करण्याची आणि ते बदलण्याची क्षमता देईल, ज्यामुळे मानवी जीवनाचे रुपच बदलेल, असा दावा कोवाल्चुक यांनी केला. पुतिन यांच्या वाढत्या वयाला ब्रेक लावण्यासाठी 2030 पर्यंत या प्रोजेक्टचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे रशियन शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

डिचोली, कारापूर, मये, साळमध्ये 'कोकम' व्यवसायाची लगबग; यंदाही आमसुले होणार 'आंबट', 40% पीक वाया; पावसावर दरवाढ अवलंबून

"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

SCROLL FOR NEXT