युक्रेन युद्धातून माघार घेतल्यास Putin यांची हत्या होईल, Elon Musk यांचा खळबळजनक दावा

Russia Ukraine War: चर्चेत भाग घेतलेल्या खासदारांमध्ये विस्कॉन्सिनचे रॉन जॉन्सन, ओहायोचे जेडी व्हॅन्स, उटाहचे माईक ली, विवेक रामास्वामी आणि क्राफ्ट व्हेंचर्सचे सह-संस्थापक डेव्हिड सॅक्स यांचा समावेश होता.
Elon Musk
Elon Musk Dainik Gomantak
Published on
Updated on

Vladimir Putin will be killed if he withdraws from Ukraine war, claims Elon Musk:

रशिया-युक्रेन युद्धाला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यात ते स्पष्टपणे सांगत आहेत की रशिया युक्रेनमधील युद्धातून आता मागे हटू शकत नाही.

अलीकडेच, टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी देखील अमेरिकन कायदेकर्त्यांसमोर हेच सांगितले. मस्क म्हणाले की, व्लादिमीर पुतिन युक्रेनमधील युद्ध हरतील अशी कोणतीही शक्यता नाही.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांनी त्यांच्या 'एक्स' स्पेसेस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा केला आहे. त्याच्यासोबत काही सिनेटर्सचाही समावेश होता, जे रशियाच्या विरोधात युक्रेनला आर्थिक मदत देण्याचा निर्णय योग्य की अयोग्य यावर चर्चा करत होते.

चर्चेत भाग घेतलेल्या खासदारांमध्ये विस्कॉन्सिनचे रॉन जॉन्सन, ओहायोचे जेडी व्हॅन्स, उटाहचे माईक ली, विवेक रामास्वामी आणि क्राफ्ट व्हेंचर्सचे सह-संस्थापक डेव्हिड सॅक्स यांचा समावेश होता.

Elon Musk
Pakistan मध्ये दोन नंबरच्या पक्षाकडे पंतप्रधानपद, तर तिसऱ्या स्थानावरील पक्षाला राष्ट्रपतीपद

या चर्चेदरम्यान रॉन जॉन्सन म्हणाले की, जे लोक रशियाविरुद्ध युक्रेनच्या विजयाची अपेक्षा करत आहेत ते प्रत्यक्षात स्वप्नांच्या जगात वावरत आहेत. मस्क यांनी याला सहमती दर्शवली आणि पुतीन युक्रेनमध्ये हरवू शकत नाहीत असे सांगितले.

युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकन संसदेत आणलेल्या विधेयकाबाबत अमेरिकन नागरिक त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या खर्चातून युक्रेनला कोणतीही मदत मिळणार नाही. युद्ध वाढवण्याने युक्रेनला फायदा होणार नाही.

Elon Musk
India Diplomacy: PAK मधून अभिनंदनची सुटका ते कतारमधील माजी नौसैनिकांच्या सुटकेपर्यंत, मोदी सरकारचे 10 राजनियक विजय

मस्क म्हणाले की, युक्रेनमधील युद्ध सुरू ठेवण्यासाठी पुतीन यांच्यावर आधीच प्रचंड दबाव आहे. जर ते मागे हटले तर त्यांना मारले जाऊ शकते. पुतीन यांच्या समर्थनार्थ विधाने करत असल्याचे अनेक लोक मानतात, मात्र तसे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मस्क म्हणाले की, रशियाला मागे ढकलण्यासाठी त्यांच्या कंपन्यांनी जेवढे काम केले आहे तेवढे क्वचितच इतर कोणत्याही कंपनीने केले असेल.

यादरम्यान त्यांनी युक्रेनियन लोकांना पुरवल्या जाणाऱ्या स्टारलिंक इंटरनेट सेवेचाही उल्लेख केला, ज्याद्वारे युक्रेनियन सैन्य रशियाविरुद्ध सहज संवाद साधू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com