Putin views Pakistan as 'key partner in South Asia': पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा खास संदेश मिळाला आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याच्या आपल्या देशाच्या उत्सुकतेचा पुनरुच्चार करुन पुतिन यांनी इस्लामाबादला दक्षिण आशिया आणि इस्लामिक जगतामधील आपले प्रमुख भागीदार मानले.
'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, हा संदेश रशियाचे ऊर्जा मंत्री निकोले शुल्गिनोव यांनी दिला, ज्यांनी लाहोरमध्ये (Lahore) पंतप्रधानांची भेट घेतली.
शुक्रवारी इस्लामाबाद येथे होणार्या पाकिस्तान-रशिया आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीच्या 8 व्या फेरीसाठी शुल्गिनोव्ह हे रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
'द एक्सप्रेस ट्रिब्यून' मधील वृत्तानुसार, बैठकीत दोन्ही बाजूंनी रशियाकडून (Russia) सवलतीच्या दरात पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यावर चर्चा केली. याशिवाय, रशियाकडून पाकिस्तानला होणाऱ्या तेल आणि वायूच्या पुरवठ्याबरोबरच गॅस पाइपलाइन प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला.
एका विशेष संदेशाद्वारे, रशियन मंत्र्याने कळवले की, पुतिन यांनी 'पाकिस्तानचा उल्लेख दक्षिण आशिया आणि इस्लामिक जगामध्ये रशियाचा एक महत्त्वाचा भागीदार म्हणून केला. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी रशियाच्या दृढ हिताचा पुनरुच्चार केला.'
शिष्टमंडळाचे स्वागत करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रशियासोबतच्या संबंधांना पाकिस्तानचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधानांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये समरकंदमध्ये पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण करुन दिली. या बैठकीत पाकिस्तान-रशिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, असे एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले.
तसेच, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तानने ज्या प्रकारे रशियन सैन्याविरुद्ध वापरण्यासाठी ब्रिटनमधून शस्त्रे पाठवली, त्यामुळे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.