Vivek Ramaswamy. Dainik Gomantak
ग्लोबल

US Presidential Election 2024: '...बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांचे नागरिकत्व रद्द करेन', रामास्वामी यांचं मोठं वक्तव्य

Vivek Ramaswamy: विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांचे नागरिकत्व संपुष्टात आणण्यास समर्थन करणार असल्याचे म्हटले आहे.

Manish Jadhav

US Presidential Election 2024: अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांचे नागरिकत्व संपुष्टात आणण्यास समर्थन करणार असल्याचे म्हटले आहे.

कॅलिफोर्नियातील सिमी व्हॅली येथील रोनाल्ड रीगन प्रेसिडेन्शियल लायब्ररी आणि म्युझियममध्ये 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षाची चर्चेची दुसरी फेरी बुधवारी पार पडली.

या चर्चेत रामास्वामी यांनी फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस आणि संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत निक्की हेली यांच्यासह इतर सहा उमेदवारांसह स्टेज शेअर करत हे वक्तव्य केले.

बुधवारी 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, जेव्हा रामास्वामी यांना विचारले गेले की ते डॉक्युमेंट नसलेल्या स्थलांतरितांना आणि त्यांच्या अमेरिकन वंशाच्या मुलांना देशातून बाहेर काढण्यासाठी 'कोणता कायदेशीर आधार' घेतील, तेव्हा त्यांनी 2015 च्या प्रस्तावाचा उल्लेख केला.

तत्कालीन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. रामास्वामी यांनी असा युक्तिवाद केला की, यूएसमधील डॉक्युमेंट नसलेल्या स्थलांतरितांच्या मुलांना नागरिकत्व देऊ नये कारण त्यांच्या पालकांनी देशात राहण्यासाठी 'कायदा मोडला'.

H-1B व्हिसाची लॉटरी पद्धत संपवण्याची गरज आहे

38 वर्षीय रामास्वामी यांनी देशाच्या दक्षिणेकडील सीमेचे लष्करीकरण, निर्वासितांना रोखणे, मेक्सिको आणि मध्य अमेरिकेला देण्यात येणारी परकीय मदत रोखणे यासारख्या इतर मुद्यांचेही समर्थन केले.

अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांचे जन्मसिद्ध नागरिकत्व संपवले जाईल. दुसऱ्या पिढीतील भारतीय-अमेरिकन असलेल्या रामास्वामी यांनी यापूर्वी H-1B व्हिसा कार्यक्रमावर टीका केली होती, ते म्हणाले की, सध्याची 'लॉटरी' प्रणाली 'रद्द करणे' आवश्यक असून गरजा पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित, कौशल्य-आधारित योजना लागू करण्यात यावी.

H-1B व्हिसा भारतीय आयटी प्रोफेशनल्समध्ये खूप लोकप्रिय आहे. हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, जो यूएस कंपन्यांना सैद्धांतिक किंवा तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेल्या विशेष व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना नियुक्त करण्यास परवानगी देतो.

H-1B व्हिसाबाबत रामास्वामी यांची भूमिका 2016 मधील ट्रम्प यांच्या प्रचाराच्या भूमिकेची आठवण करुन देणारी आहे. तत्कालीन उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी या परदेशी कामगारांबाबत कठोर भूमिका घेतली होती. मात्र, नंतर त्यांनी मवाळता दाखवली होती.

विवेक रामास्वामी 'ट्रम्पचे उत्तराधिकारी'

'पॉलिटिको' या वृत्तपत्रानुसार, 2018 ते 2023 पर्यंत, यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने रामास्वामी यांच्या पूर्व कंपनी रोइव्हंट सायन्सेसला H-1B व्हिसाच्या अंतर्गत कर्मचारी नियुक्त करण्यासाठी 29 अर्ज मंजूर केले. प्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने रामास्वामी यांचे “ट्रम्पचे उत्तराधिकारी” म्हणून वर्णन केले आहे.

23 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय 'प्राथमिक' चर्चेनंतर त्यांनी बरेच लक्ष वेधले आहे. वादविवादानंतरच्या पहिल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 504 प्रतिसादकर्त्यांपैकी 28 टक्के लोकांनी रामास्वामी यांनी सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT