Viral Video look blue meat of flesh Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: निसर्गाची किमया पाहून व्हाल हैराण! पाहा या माशात काय आहे खास

आपण सर्व जाणतो की मांस एकतर गुलाबी किंवा लाल रंगाचे असते. पण इथे माशाच्या मासाचा रंग वेगळाच आहे

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला विचारले की माशांच्या मांसाचा रंग कसा असतो? तर साहजिकच, बहुतेक लोक लाल किंवा गुलाबी असेच उत्तर देतील. आणि हेच आपण पाहत आलोय. बहुतेक प्राण्यांच्या मांसाचा रंग गुलाबी किंवा लाल असतो. पण असे काही प्राणी आहेत ज्यांच्या मासाचा आणि रक्ताचा रंग लाल नसतो. अशाच एका माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या मांसाचा रंग लाल ऐवजी निळा आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला तो आश्चर्यचकित झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चाकूने मासे कापताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माशांच्या मांसाचा रंग निळा आहे. जसे आपण सर्व जाणतो की मांस एकतर गुलाबी किंवा लाल रंगाचे असते. पण इथे माशांचे मांस निळ्या रंगाचे असते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या माशाचे नाव लिंगकोड (lingcod) आहे. त्याला बफेलो कॉड (Buffalo Cod) असेही म्हणतात. हे O. elongatus प्रजातीच्या Hexagrammidae प्रजातीचा आहे.

काही सेकंदांचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये या माशाची माहिती देताना यूजरने त्याचे वर्णन लिंगकोड फिश असे केले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1600 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

ब्लू मीट फिशचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारला आहे की, त्याचा रंग निळा का आहे? त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, 'हे आश्चर्यकारक आहे. मी माझ्या आयुष्यात यापूर्वी असे मांस यापुर्वी कधीच पाहिले नव्हते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, बहुतेक युजर्सनी आश्चर्यचकित इमोजीसह आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT