कोरोनाने निर्माण केले नवे संकट! सागरी प्राण्यांसाठी बनू शकते हे 'मृत्यूचे कारण'

कोरोना महामारीमुळे (Covid19) जगभरात नानाविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यातील एक समस्या प्लास्टिक कचऱ्याची आहे.
Plastic
PlasticDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना महामारीमुळे (Covid19) जगभरात नानाविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यातील एक समस्या प्लास्टिक कचऱ्याची आहे. कोविड-19 महामारीमुळे जगभरात 8 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा वाढला आहे. त्यापैकी 25 हजार टनांपेक्षा जास्त प्लास्टिक (Plastic) कचरा समुद्रामध्ये गेला असल्याचे एका अभ्यासातून दावा करण्यात आला आहे.

'प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, समुद्रातील प्लास्टिकच्या कचऱ्याचा एक महत्त्वाचा भाग तीन ते चार वर्षांत लाटांच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्यांवर येणार कचरा आहे. ढिगाऱ्याचा एक छोटासा भाग खुल्या समुद्रात जाईल जो अखेरीस महासागराच्या मध्यभागी अडकेल. यामुळे आर्क्टिक महासागरात भरपूर कचरा साचू शकतो.

Plastic
पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय भव्य लघुग्रह

मास्क, हातमोजे आणि फेस शिल्डमुळे कचरा वाढला

संशोधकांनी नमूद केले की, कोविड-19 साथीच्या आजारामुळे फेस मास्क, हातमोजे आणि फेस शील्ड यासारख्या एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. परिणामी, निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा काही भाग नद्या आणि महासागरांमध्ये सोडण्यात येतो. ज्यामुळे आधीच नियंत्रणाबाहेर असलेल्या जागतिक प्लास्टिक समस्येवर आपोआप वाढतो.

आशियातील सर्वाधिक कचरा

संशोधकांनी 2020 मध्ये महामारीच्या सुरुवातीपासून ते ऑगस्ट 2021 पर्यंतचा डेटा समाविष्ट केला आहे. त्यात असे आढळून आले की, महासागरात जाणारा बहुतांश प्लास्टिक कचरा आशिया खंडातून येत आहे. त्यात बहुतांश रुग्णालयातील कचरा आहे. विकसनशील देशांमध्ये वैद्यकीय कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन करण्याच्या गरजेवर या अभ्यासात भर देण्यात आला आहे. सह-लेखिका अमीना शॉर्टअप, UC सॅन दिएगो येथील सहाय्यक प्राध्यापक, म्हणाल्या: 'जेव्हा आम्ही गणना सुरु केली तेव्हा आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटले की, वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण हे व्यक्तींच्या वैयक्तिक कचऱ्याच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त होते. हा कचरा आशियाई देशांतून प्रामुख्याने येत होते. अतिरीक्त कचऱ्याचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे अशा भागात रुग्णालये आहेत जी आधीच साथीच्या आजारापूर्वी कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांशी झगडत होती.

Plastic
रशियामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले कोरोनाचे संकट

हे मॉडेल कसे कार्य करते

अभ्यासात सहभागी असलेले नानजिंग विद्यापीठातील प्रोफेसर यांक्सू झांग म्हणाले की, अभ्यासात वापरलेले नानजिंग विद्यापीठ एमआयटीजीसीएम-प्लास्टिक मॉडेल (एनजेयू-एमपी) "एक आभासी वास्तविकता" सारखे कार्य करते. सूर्यप्रकाशामुळे कुजलेले प्लास्टिक समुद्राच्या पृष्ठभागावर कसे तरंगते, प्लँक्टनमुळे दूषित होते, समुद्रकिनाऱ्यांवर परत येते आणि खोल पाण्यात बुडते हे मॉडेलचे अनुकरण करते.

आशियाई नद्यांमधून 74% प्लास्टिक

आशियाई नद्यांचा वाटा एकूण प्लॅस्टिकपैकी 73 टक्के आहे, ज्यामध्ये शत अल-अरब, सिंधू आणि यांगत्झी नद्या या प्रमुख तीन योगदानकर्ते आहेत, ज्यांचा निचरा पर्शियन गल्फ, अरबी समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात होतो. संशोधकांनी सांगितले की, युरोपियन नद्यांमधून 11 टक्के प्लास्टिक कचरा महासागरांमध्ये प्रवेश करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com