Helicopter Crash Dainik Gomatak
ग्लोबल

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Helicopter Crash In France: फ्रान्समध्ये जंगलातील आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान एका अग्निशमन हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला.

Manish Jadhav

Helicopter Crash In France: फ्रान्समध्ये जंगलातील भीषण आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान एका अग्निशमन हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर पाण्यासाठी एका तलावाजवळ उतरत असतानाच नियंत्रणाबाहेर गेले आणि वेगाने फिरत पाण्यात कोसळले. रविवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी 7 वाजल्यानंतर रोस्पोर्डेन तलावात ही थरारक घटना घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि हेलिकॉप्टरमधील पायलट, दोन क्रू मेंबर्ससह एक प्रत्यक्षदर्शी सुरक्षित बचावला.

नेमकं काय घडलं?

स्थानिक वेळेनुसार शनिवारी (23 ऑगस्ट) दुपारी फ्रान्सच्या (France) दक्षिणेकडील ल्योंझ शहरालगत असलेल्या एका जंगलात मोठी आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांसह हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली होती. हे हेलिकॉप्टर जवळच्या 'रोस्पोर्डेन' नावाच्या तलावातून पाणी भरुन आगीच्या दिशेने जात होते. याचवेळी, हेलिकॉप्टरने अचानक नियंत्रण गमावले.

व्हिडिओमध्ये दिसते की, हेलिकॉप्टर पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर अचानक फिरु लागले. त्याचे शेपूट अनियंत्रित झाल्यामुळे ते प्रचंड वेगाने गोल फिरत कोसळले. काही सेकंदातच हेलिकॉप्टर तलावात बुडाले. हा थरारक क्षण पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांचाही थरकाप उडाला.

व्हिडिओ व्हायरल आणि तात्काळ बचावकार्य

एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण थरार कैद केला. अपघातानंतर लगेचच हेलिकॉप्टरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अवघ्या काही तासांतच लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. अपघाताची तीव्रता पाहून तेही थक्क झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. हेलिकॉप्टरच्या कोसळण्यामुळे पायलट आणि त्याच्यासोबत असलेले 2 क्रू मेंबर पाण्यात अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले. याचदरम्यान, अपघाताच्या वेळी तलावाजवळ उपस्थित असलेला एक प्रत्यक्षदर्शी या घटनेमुळे घाबरुन पाण्यात पडला. त्यालाही वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

चौकशीचे आदेश आणि प्रशासनाचा दिलासा

स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख (Emergency Management Head) यांनी सांगितले की, "हेलिकॉप्टरच्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हा मोठा दिलासा आहे. आम्ही तातडीने बचावकार्य सुरु केले आणि तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले."

दरम्यान, या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने आदेश दिले आहेत. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड होता की चालकाची काही चूक, याचा तपास केला जात आहे. तसेच, हेलिकॉप्टरचे पार्ट पाण्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली असून आपत्कालीन दलाची प्रशंसा होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामातील धोक्याची जाणीव करुन दिली आहे. अशा परिस्थितीतही ते आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कार्य करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Goa Live Updates: अखेर दिगंबर कामत, रमेश तवडकर यांना खात्यांचे वाटप

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

SCROLL FOR NEXT