
Shocking Gym Fight Video: आजकाल सोशल मीडियाच्या जगात छोट्यातल्या-छोटी क्षणार्धात व्हायरल होते. अलीकडेच असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून जो एका जिममधील आहे. सहसा लोक जिममध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि शांततेत व्यायाम करण्यासाठी जातात, पण या व्हिडिओमध्ये शांततेऐवजी मारामारी आणि हाणामारीचे विचलित करणारे दृश्य पाहायला मिळाले. हा व्हिडिओ इतका अनपेक्षित आहे की, तो पाहणाऱ्या प्रत्येकालाच धक्का बसला आहे. या घटनेने जिमसारख्या सुरक्षित जागेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
व्हिडिओच्या (Video) सुरुवातीला जिममधील वातावरण अगदी सामान्य दिसते. लोक आपापल्या वर्कआउटमध्ये व्यस्त आहेत. काही लोक वेट लिफ्टिंग करत आहेत, तर काही ट्रेडमिलवर धावत आहेत. सर्वत्र शांतता आणि नियमितपणा जाणवते. पण अचानक काही तरुण जिममध्ये घुसतात आणि संपूर्ण वातावरण बदलून टाकतात. हे तरुण थेट जिममधील एका व्यक्तीकडे जातात आणि त्याच्याशी वाद घालू लागतात. बघता बघता त्यांच्यातील वाद इतका वाढतो की, त्याचे रुपांतर हाणामारीत होते. त्या तरुणांचा संपूर्ण गट त्या एका व्यक्तीवर तुटून पडतो. सुरुवातीला ते केवळ मुक्क्यांनी आणि लाथांनी हल्ला करतात, पण त्यानंतर ते जिममध्ये ठेवलेल्या लोखंडी रॉडचाही वापर करताना दिसतात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, तो व्यक्ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, पण हल्लेखोर त्याच्यावर तुटून पडले.
दरम्यान, ही हाणामारी सुरु असतानाच पीडित व्यक्तीचा एक मित्रही त्याला वाचवण्यासाठी पुढे येतो आणि तोही हल्लेखोरांशी भिडतो. काही वेळ दोन्ही बाजूंनी जोरदार मारामारी होते. काही क्षणांपूर्वी शांत असलेले जिमचे वातावरण आता पूर्णपणे एखाद्या रणभूमीसारखे बनले. थोड्या वेळाने हाणामारी थांबते आणि लोक हळूहळू तेथून निघून जातात. ही संपूर्ण घटना जिममधील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आणि जसा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला, तसा तो आगीसारखा पसरला. ‘एक्स’ (X) प्लॅटफॉर्मवर @Madan_Chikna नावाच्या वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला. काही तासांतच तो लाखो वेळा पाहिला गेला आणि हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
व्हिडिओवर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रियाही वेगवेगळ्या होत्या. काही लोकांनी या घटनेची खिल्ली उडवत 'आज जिम क्लासचे प्रॅक्टिकल होते' असे लिहिले, तर दुसऱ्या एका युजरने 'कोणत्या टीमचे लोक कोणाला मारत आहेत, हेच कळले नाही' अशी प्रतिक्रिया दिली. या विनोदी प्रतिक्रियांबरोबरच अनेक यूजर्संनी गंभीर प्रश्नही उपस्थित केले. जिमसारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडणे सुरक्षेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते, असे त्यांचे म्हणणे होते. एकूणच, हा व्हिडिओ केवळ सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरला नाही, तर या घटनेने जिमसारख्या सुरक्षित ठिकाणीही अचानक परिस्थिती कशी बिघडू शकते, यावर विचार करण्यास भाग पाडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.