Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: नदीत पिकअप आणि मगरीचा थरार...! धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी हैराण

Viral Crocodile Video: काकाडू नॅशनल पार्कमध्ये नुकतीच अशीच एक थरारक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Viral Crocodile Video: ऑस्ट्रेलियात जगातील काही सर्वात धोकादायक आणि महाकाय मगरमच्छ आढळतात. येथील काकाडू नॅशनल पार्कमध्ये नुकतीच अशीच एक थरारक घटना घडली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Midea) तुफान व्हायरल होत आहे. या घटनेत नदी पार करत असलेल्या एका पिकअप ट्रकसोबत नेमके काय घडले, ते पाहून सारेच थक्क झाले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

नदीत पिकअप ट्रक आणि मगरमच्छ

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक काळ्या रंगाचा पिकअप ट्रक नदीतून (River) पार होताना दिसत आहे. हा ट्रक हळू-हळू पुढे सरकत असताना, अचानक पाण्याच्या खाली एक मोठा मगरमच्छ दिसतो. हा मगरमच्छ गाडीच्या खाली (Under the vehicle) अडकलेला दिसतो आणि त्याचे तोंड उघडे असल्याचेही व्हिडिओत स्पष्ट दिसते.

काहीतरी विचित्र घडत असल्याचा अंदाज आल्याने ट्रकचालक (Truck Driver) गाडी थांबवतो. त्याचवेळी, तो मगरमच्छ मागे वळतो आणि पुन्हा नदीच्या पाण्यात निघून जातो. या घटनेत मगरमच्छाला कोणतीही गंभीर इजा झाली नाही असे दिसते. हा संपूर्ण थरारक व्हिडीओ '@clowndownunder' नावाच्या 'एक्स' (X) युझरने शेअर केला.

काकाडू नॅशनल पार्कमध्ये मगरमच्छांची मोठी संख्या

काकाडू नॅशनल पार्कमधील 'काहिल्स क्रॉसिंग' (Cahills Crossing) हे मगरमच्छांच्या मोठ्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रति किलोमीटर 5 ते 9 मगरमच्छ असल्याचा अंदाज आहे. हा परिसर माणूस आणि मगरमच्छ यांच्यातील धोकादायक संघर्षांमुळे नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच, याच क्रॉसिंगवरुन वाहन वाहून गेल्यानंतर 2 लोकांना वाचवण्यात आले होते.

येथे येणाऱ्या लोकांसाठी प्रशासनाने धोक्याची सूचना (Warning) आधीच दिली आहे. निष्काळजीपणामुळे गंभीर जखमा किंवा मृत्यूही होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांच्या मते, हा परिसर खूप धोकादायक आहे, कारण येथे नेहमीच मगरमच्छ आसपास असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT