Revolutionary Armed Forces of Columbia

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

कोलंबियामध्ये अंमली पदार्थ तस्करीच्या मार्गावर हिंसाचार, 24 जणांचा मृत्यू

कोलंबियाच्या (Columbia) पूर्वेकडील अरौका राज्यात बंडखोर गटांमधील संघर्ष वाढत असताना या आठवड्याच्या शेवटी झालेल्या हिंसाचारात किमान 24 लोक ठार झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

कोलंबियाच्या पूर्वेकडील अरौका राज्यात बंडखोर गटांमधील संघर्ष वाढत असताना या आठवड्याच्या शेवटी झालेल्या हिंसाचारात किमान 24 लोक ठार झाले आहेत. त्याच वेळी, 20 लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले. कोलंबियाच्या (Colombia) संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया (FARC) सोबत 2016 च्या शांतता करारानंतर कोलंबियाचे सरकार हत्येचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी झाले, परंतु अलीकडील वाढलेल्या हिंसाचारामुळे त्याला धक्का बसला आहे.

दरम्यान, देशाच्या ग्रामीण भागात हिंसाचार (Violence) रोखण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे, जिथे बंडखोर गट आणि ड्रग तस्कर संघटना तस्करीचे मार्ग, बेकायदेशीर खाणकाम आणि इतर बाबींवर आपापसात भांडत आहेत. अरौकामध्ये सर्वाधिक तेलाच्या विहिरी असून तेल चोरीचे प्रमाण देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहे. तसेच विद्रोही गटांकडून हल्ल्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अरौका राज्य व्हेनेझुएलाच्या (Venezuela) सीमेला लागून आहे.

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी युद्ध सुरु

कोलंबियाच्या लष्कराने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल लिबरेशन आर्मी आणि शांतता करारात सामील होण्यास नकार देणारे माजी FARC सदस्य यांच्यात अरौकामध्ये हिंसाचार झाला. दोन्ही गट या भागात अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढत आहेत. जुआन कार्लोस विलेट, मानवाधिकार अधिकारी, यांनी कोलंबियाच्या ब्लू रेडिओला सांगितले की, आम्हाला आठवड्याच्या शेवटी 50 बेपत्ता आणि 27 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळाल्या आहेत. विस्थापन आणि अपहरणाच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर हिंसाचार वाढल्याचा आरोप

गेल्या वर्षी अरौकामध्ये शेकडो शरणार्थी आले होते. जे व्हेनेझुएलाचे सैन्य आणि FARC गट यांच्यातील लढाईनंतर पळून गेले होते. राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक (Ivan Duque) यांनी सोमवारी सांगितले की, आम्ही सशस्त्र गटांना रोखण्यासाठी आणि व्हेनेझुएलाच्या सीमेवर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अधिक सैन्याची कुमक पाठवली आहे. ड्यूक यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरोवर (Nicolas Maduro) यापैकी काही बंडखोर गटांना आश्रय दिल्याचा आरोप केला आणि सांगितले होते की, कोलंबिया त्यांच्याशी सर्व शक्तीनिशी लढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT