ट्रम्प यांच्यावर खटला चालवा अन्यथा...; इराणने दिली बदला घेण्याची धमकी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पीओ यांच्यावर सुलेमानी यांच्या हत्येचा खटला चालवला गेला पाहिजे. तसे केले नाही तर इराण बदला घेईल.
Ebrahim Raisi

Ebrahim Raisi

Dainik Gomantak 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी अमेरिकेला जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. सुलेमानी यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त रायसी (Ebrahim Raisi) म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पीओ यांच्यावर सुलेमानी यांच्या हत्येचा खटला चालवला गेला पाहिजे. तसे केले नाही तर इराण बदला घेईल.

दरम्यान, 3 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार इराकमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला होता. यामध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुड्स फोर्सचा कमांडर सुलेमानी मारले गेले होते. सुलेमानी यांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त इराण (Iran) आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते.

<div class="paragraphs"><p>Ebrahim Raisi</p></div>
तालिबानने हमाममध्ये महिलांच्या प्रवेशावर घातली बंदी

शिवाय, अध्यक्ष रेसी यांनी सोमवारी एका भाषणात सांगितले की, "जर जनरल सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी ट्रम्प आणि पोम्पीओवर कारवाई झाली नाही, तर मुस्लिम समुदाय या हौतात्म्याचा बदला घेईल." त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे हल्लेखोर, मारेकरी आणि मुख्य आरोपी असे वर्णन केले असून इस्लामिक कायद्यानुसार त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, असेही म्हटले आहे.

इराणच्या इस्लामिक कायद्यानुसार खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला फाशी दिली जाते, जोपर्यंत पीडितेचे कुटुंब 'ब्लड मनी' घेऊन समेट करण्यास तयार होत नाही तोपर्यंत.

दुसरीकडे, इराणच्या न्याय अधिकाऱ्यांनी सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी नऊ देशांतील 127 लोकांना आरोपी केले आहे. या देशांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यातील 74 आरोपी अमेरिकेचे नागरिक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com