Kyrgyzstan Tajikistan Water dispute between the two countries 31 killed 
ग्लोबल

Kyrgyzstan Tajikistan Violence: दोन देशात पाण्यावरून वाद; 31 ठार शेकडो जखमी

गोमंन्तक वृत्तसेवा

Kyrgyzstan Tajikistan: दोन देशांमधील पाण्याच्या वादात(Violence) कमीतकमी 31 लोकांचा बळी गेला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. तर 11 हजाराहून अधिक लोकांना आपली घरं सोडून पळून जावं लागलं आहे. पाण्यावरून किर्गिस्तान(Kyrgyzstan Tajikistan) आणि ताजिकिस्तानमधील तणाव बरेच वर्ष जुना आहे. परंतु गुरुवारपासून येथे भीषण हिंसक संघर्ष पाहायला मिळाला.(Kyrgyzstan Tajikistan Water dispute between the two countries 31 killed)

आतापर्यंत 150 लोकांचा बळी

हिंसक चकमकींमुळे दोन्ही देशांकडून भयंकर दगडफेक झाली. यानंतर सैन्यात गोळीबारही झाला. ठार झालेल्या नागरिकांची संख्या 31 वर पोहचली आहे. जोरदार हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. असे किर्गिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे. किर्गिस्तानची पहिली उप आरोग्य आणि सामाजिक विकास मंत्री एलिझा सोल्टनबिकोवा म्हणाली की आतापर्यंत आमच्या 150 लोकांचा बळी गेला आहे, त्यातील 31 जणांचा गुरुवारी सुरू झालेल्या हिंसक संघर्षात मृत्यू झाला आहे.

हिंसक संघर्षात 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

किर्गिस्तानमध्ये मृत्यू झालेल्या लोकांमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तिचा जन्म 2008 साली झाला होता. किर्गिस्तानने असेही सांगितले की आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांना सीमाभागातून घरे सोडून जावे लागले. ताजिकिस्तान बरोबरचे युद्ध येथे फारच भयंकर झाले आहे. गुरुवारी दोन्ही देशांच्या सैन्यात गोळीबार झाला. पण नंतर युद्धबंदीची घोषणा झाली आणि दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या बेसवर परतले.

दोन देशांमध्ये पाण्यासाठी वाद

दोन देशांमधील इस्फारा नदीवर सुरू असलेले बांधकाम काम मुळात वादाचे मुख्य कारण आहे. ताजिकिस्तानच्या सुरक्षा समितीने आरोप केला आहे की किर्गिस्तानच्या सैन्याने गोलोवनाया पाणी वितरण पॉइंटवर गोळीबार केला होता. नदीवर सुरू असलेल्या बांधकाम कामांवरून दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. फरगाना घाटातील जमिन अत्यंत सुपीक आहे आणि किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या तीन देशांमध्ये याच जमिनिवरून वाद सुरू आहे. सोव्हिएत युनियनमध्ये फुट पडल्यानंतर हे तीन देश वेगळे झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Box Cricket: एक कोटींचं बक्षीस! जगातील सर्वात मोठ्या 'बॉक्स क्रिकेट' स्पर्धेचे आयोजन, 'गोमन्तक-सकाळ'तर्फे गोव्यासह महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Rohan Harmalkar: जमीन हडप प्रकरण; रोहन हरमलकरची 212.85 कोटींची मालमत्ता 'ED'कडून जप्त

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

SCROLL FOR NEXT